मुंबई – तारक मेहता का उल्टा चष्मा या सुप्रसिद्ध मालिकेतील जेठालालचे पात्र साकारणाऱ्या दिलीप जोशी यांनी दीपावलीच्या सणात नवी कार खरेदी केली आहे. जेठालाल यांचे लाखो चाहते आहेत. त्यांची भूमिका अप्रतिम आहे. त्यामुळेच त्यांच्या खासगी जीवनाविषयी चाहत्यांना विशेष रस असतो. दिलीप जोशी यांनी घेतलेल्या नव्या कारचा फोटो व्हायरल झाला आहे.
दिवाळीचा सण हा नवीन वस्तू खरेदीसाठी उत्तम समजला जातो. त्यामुळे या उत्सवात सर्वांमध्ये विशेष उत्साह असतो. दिलीप जोशी यांनीही या सणाचा उत्तम मुहूर्त साधला आहे. जोशी यांनी काळ्या रंगाची कार खरेदी केली आहे. ही कार किया कंपनीची सोनेट ही सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. या गाडीचे बाजारातील मूल्य सव्वा बारा ते साडेबारा लाखाच्या दरम्यान आहे. नवीन कार खरेदीचा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यात जोशी यांचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. त्यात दिलीप जोशी यांची पत्नी जयमाला जोशी यांचाही समावेश आहे.
https://twitter.com/viralbhayani77/status/1456858382254546949