इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडियामुळे व्यक्तिगत आयुष्यातील अनेक छोट्या छोट्या गोष्टी लोकांसोबत शेअर केल्या जातात. सेलिब्रिटीजच्या बाबतीत तर हे जरा जास्तच असतं. आणि त्याकडे त्यांच्या चाहत्यांचं, टीकाकारांचंही लक्ष असतं. सेलिब्रिटीजनी टाकलेल्या कोणत्याही पोस्टला, व्हिडीओजला किंवा फोटोजना शेकडोंनी लाईक्स असतात. तर काही त्यांना ट्रोलही करतात. छोट्या पडद्यावरील अशीच एक अभिनेत्री सध्या ट्रोल होते आहे. निमित्त आहे ते तिने शेअर केलेल्या फोटोचे.
छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटतात. त्यामुळेच त्यातील कलाकारांना देखील ते आपले मानतात. या कलाकारांची सुखं – दुःख हे स्वतःची मानतात. तर ते कुठे चुकले तर हक्काने त्यांचे कानही उपटतात. छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील एक अभिनेत्री सध्या अशीच ट्रोल होते आहे. बेडवरील फोटो शेअर केल्यामुळे प्रिया अहुजा ट्रोल होते आहे. पण, चाहत्यांच्या भावनांचा आदर राखत प्रियाने आपल्यावर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मालिकेप्रमाणेच त्यातील कलाकरांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. याच मालिकेने अभिनेत्री प्रिया अहुजालाही लोकप्रियता मिळाली. रिटा रिपोर्टर या व्यक्तिरेखेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. काही दिवसांपूर्वी प्रियाने एका मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केलं होतं. याचे फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले. बेडवरील या फोटोशूटमुळे प्रियाला ट्रोल करण्यात आलं. आता अभिनेत्रीने या ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर करत टीकाकारांचा समाचार घेतला आहे.
प्रिया म्हणते, “तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, याचा मला काहीच फरक पडत नाही. तुमच्यापैकी अनेकांनी कमेंटमध्ये माझा पती मालवलाही टॅग केलं. तुझी पत्नी कशी आहे आणि असे कपडे तू तिला कसे काय घालून देतोस, असंही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. माझा मुलगा त्याच्या आईबद्दल काय विचार करेल आणि एक आई म्हणून मी त्याला काय शिकवण देत आहे, अशाही कमेंट अनेकांनी केल्या आहेत.” हे सांगून प्रिया म्हणते, मी काय करायचं, कसं वागायचं हे मला ठरवू दे ना. एक पत्नी आणि आई म्हणून मी कशी आहे, हा माझ्या घरच्यांना ठरवू दे. मी काय घालायचं, कस वागायचं, यासाठी तुमच्या कोणाची परवानगी घ्यायची गरज मला वाटत नाही. माझं आयुष्य कसं जगायचं हे मी ठरवेन. माझ्या प्रेमापोटी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद, पण मला याची गरज वाटत नाही, असंही प्रिया शेवटी टीकाकारांना सुनावते.
TMKOC Fame Priya Ahuja Troll Social Media
Post Photo Internet Actress Entertainment TV Show