इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कितीही टेन्शन असले तरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ पाहिला की सगळं टेन्शन पळून गेलंच पाहिजे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने नुकतीच १४ वर्ष पूर्ण केली. सध्या ही मालिका काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. १४ वर्षांच्या प्रवासात या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले, तर काहींनी या मालिकेला रामराम ठोकला.
ही मालिका प्रेक्षकांसाठी ताण तणावावरचे रामबाण औषध होती. आणि त्यातील कलाकार हे त्यांच्या भूमिका व्यवस्थित वठवत असल्याने दुसऱ्या कुणाला त्यांच्या जागी पाहणे कुणालाच पसंत पडणारे नव्हते. गेल्या काही वर्षीपासून मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी या मालिकेत दिसत नाहीये. दयाबेन पुन्हा या कार्यक्रमात येईल याची वाट चाहते पाहत होते. मात्र टिपूच्या नवऱ्यामुळे तिने मालिका सोडली असल्याने सांगितले जात आहे.
दिशा वाकानीला मालिका सोडून जवळपास पाच वर्षे झाली आहेत. पण तिचे चाहते अजूनही तिच्या परतण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते चांगलेच संतापले आहेत. वास्तविक, तिच्या एका चाहत्याने तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका मुलासोबत दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिशाची प्रकृती खूपच वाईट दिसत आहे.
यानंतर चाहत्यांनी तिच्या वाईट अवस्थेसाठी पतीला जबाबदार धरून संताप व्यक्त केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दिशाला नो मेकअप लूकमध्ये ओळखणं कठीण आहे. याशिवाय तिचे वजनही पूर्वीच्या तुलनेत खूप वाढलेले दिसते आहे. खरंतर तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की, ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची दयाबेन आहे. फोटो पाहून चाहते म्हणत आहेत की, दिशाच्या या वाईट अवस्थेला तिचा नवरा जबाबदार आहे आणि तिच्या पतीमुळेच तिची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे. तिच्या पतीने तिचं करिअर बरबाद केल्याचे एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं आहे.
https://www.instagram.com/p/Cht_5OZKG-A/?utm_source=ig_web_copy_link
TMKOC Fame Disha Vakani Current Status Career
Tarak Mehta ka Ooltah Chashmah Dayaben