इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मनोरंजक कार्यक्रम म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. मध्यंतरीच्या काळात या कार्यक्रमातील अनेक कलाकार बदलले गेले. काही कलाकारांनी मालिका सोडली. यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी असली तरीही कार्यक्रमाची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. मालिकेतील सर्वाधिक चर्चेतले पात्र म्हणजे दया बेन.
दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. तेव्हापासून दिशा गायब आहे. आता दयाबेनचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तिने तिच्या लेकाची झलक दाखवली आहे. दिशा वकानीच्या एका चाहत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करते आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी घराघरात हिट झाली. नुकतंच सोशल मीडियावर दिशाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दिशा वकानीच्या एका चाहत्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
दिशा वकानीचा हा व्हिडीओ महाशिवरात्रीचा आहे. या व्हिडीओत दिशा, दिशाचे पती मयूर, तिची मुलगी शिवलिंगाची पूजा करताना दिसते आहे. दिशाच्या मुलाची पहिली झलकही या व्हिडीओमध्ये चाहत्यांना पाहायला मिळाली. या व्हिडीओत तिचे संपूर्ण कुटुंबच मनोभावे महाशिवरात्रीची पूजा करताना दिसते आहे. दिशाचा हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी हे भावूक झाले आहेत.
अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तिला मालिकेत परतण्याची विनंती केली आहे. तर काहींनी तिच्या मुलाचे नाव काय, असा प्रश्न विचारला आहे. २०१७ मध्ये दिशा प्रसूती रजेवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांबच आहे. काही महिन्यांनी दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला. या मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्या जागी नवी अभिनेत्री शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी ठरले.
TMKOC Fame Daya Ben Current Video Viral