गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘तारक मेहता’मधील ‘बबिता’चा अपघात; तिनेच दिली माहिती

by India Darpan
नोव्हेंबर 22, 2022 | 5:12 am
in मनोरंजन
0
babita munmun datta e1669041272216

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. दीड दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातील अनेक घटनांशी मिळत्या जुळत्या प्रसंगांमुळे ही मालिका चाहत्यांच्या जवळची आहे. सध्या या मालिकेतील अनेक कलाकार यातून बाहेर पडत आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहेच. पण आता यातील कलाकारांचे अपघात होत असल्याने मालिकेतील कलाकार यातून ब्रेक घेत आहेत. नुकताच यातील चंपक चाचा या व्यक्तिरेखेचा अपघात झाल्याने त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतला आहे. ही घटना ताजी असतानाच आता मालिकेतील बबिता अर्थत मुनमुन दत्ता हिचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. बबिता या एका ट्रीपवर असताना हा अपघात झाला असून यासंदर्भात त्यांनीच पोस्ट लिहीत माहिती दिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करते आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. जेठालाल, दयाबेन, बबिता, टप्पू, चंपक चाचा या भूमिकांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. यातील बबिता यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिचा जर्मनीमध्ये अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुनमुन यांना फिरण्याची फारच आवड आहे. आठवड्याभरापूर्वी त्यांनी युरोप ट्रिपची सुरुवात केली. मात्र, जर्मनीत त्यांचा छोटा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांना घरी परतावं लागत आहे. मुनमुनने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याची माहिती दिली आहे. ‘जर्मनीमध्ये माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मी पुढचा प्रवास करू शकत नाही. मला घरी परत जावं लागतंय’, अशी पोस्ट मुनमुनने केली आहे.

मुनमुनची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी आणि चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी तारक मेहतामध्ये जेठालाल यांचे वडील चंपक चाचाची भूमिका करणाऱ्या अमित भट्ट यांना देखील अपघात झाला होता. त्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. आता मुनमुन दत्ताच्या अपघाताच्या बातमीने चाहत्यांमध्ये चिंता आहे. यामुळे चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पायाला दुखापत झाली असून चाहत्यांनी काळजी करू नये, आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. मला दुखापत झाल्यानं दौरा अर्धवट सोडावा लागत असल्याचे मुनमुननं म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुनमुन स्वित्झर्लंडच्या इंटरलेकन ट्रेनने जर्मनीला पोहोचली. या ट्रिपचे फोटो ती सतत चाहत्यांसोबत शेअर करत होती. बॉलिवूडच्या प्रसिद्ध शूटिंग डेस्टिनेशनवरूनही तिने सुंदर फोटो पोस्ट केले होते. २००८ पासून मुनमून ‘तारक मेहता..’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेतील अनेक कलाकार आजवर बदलल्या. मात्र बबिता जी ही भूमिका सुरुवातीपासून मुनमुनच साकारत आहे. या मालिकेशिवाय तिने काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. कमल हसन यांच्या ‘मुंबई एक्स्प्रेस’ आणि २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॉलिडे’ या चित्रपटात तिने काम केलं.

TMKOC Fame Actress MunMun Datta Accident
Entertainment TV Show

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईतील या भागात राहणाऱ्या रहिवाशांचे होणार पुनर्वसन; राज्य सरकारचा निर्णय

Next Post

सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटाच्या आमदाराचे तोंडभरुन कौतुक; नेमकं चाललंय काय?

India Darpan

Next Post
संग्रहित फोटो

सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटाच्या आमदाराचे तोंडभरुन कौतुक; नेमकं चाललंय काय?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011