मुंबई – टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो तथा मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना आवडते. या शोमधील असेच एक लोकप्रिय पात्र म्हणजे ‘भिडे मास्टर’. ही भूमिका अभिनेता मंदार चांदवडकर यांनी साकारलेली आहे. यात त्यांची ऑनस्क्रीन बायको ‘माधवी भाभी’ आहे. ती अतिशय सुंदर आहे. पण प्रत्यक्षात मंदार यांची खरी बायकोही त्यापेक्षा कमी सुंदर नाही. कोण आहे भिडे मास्टर तथा मंदार चांदवडकर यांची खरी बायको?
‘तारक मेहता का उलटा चष्मा ‘ हा प्रत्येक घरातला आवडता कार्यक्रम असून तो बर्याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यातील एक म्हणजे आत्माराम तुकाराम भिडे यांची भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर. या कार्यक्रमात भिडे हे शिक्षक आणि समाजसेवक यांच्या भूमिकेत दिसतात. तर लोणचे आणि पापड यांचा व्यवसाय करणारी माधवी भिडे म्हणजेच सोनालिका जोशी त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसते. चा अभिनय पाहून बर्याच लोकांना असे वाटते की, दोघेही खरोखरच नवरा-बायको आहेत, परंतु तसे नाही.
मंदार चांदवडकर यांची वास्तविक जीवनातील पत्नी ही माधवी भाभीपेक्षा कमी नाही. मंदार यांच्या पत्नीचे नाव स्नेहल चांदवडकर असून सौंदर्याच्या बाबतीतही स्नेहल सोनालिका जोशीपेक्षा मागे नाही. मंदार यांनी काही वर्षांपूर्वी स्नेहल चांदवडकर यांच्याशी मराठी रुढी आणि परंपरेनुसार लग्न केले. या दोघांच्या लग्नाचा फोटोही एकदा खूप व्हायरल झाला होता.
मंदार यांची पत्नी मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे. म्हणजेच मंदार यांची सासरवाडी इंदूर आहे. मंदार आणि स्नेहल चांदवडकर यांना एक मुलगा असून त्याचे नाव पार्थ आहे. मंदार आपल्या कुटुंबासमवेत बराच वेळ घालवितो. तर स्नेहल या घराचे उत्तम व्यवस्थापन करतात. स्नेहल या मंदार यांच्यासोबत बर्याच कार्यक्रमांमध्येही दिसल्या आहेत. तसेच स्नेहल ही तिच्या पतीप्रमाणे अभिनयाशी संबंधित आहेत. स्नेहलच्या अभिनयाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत. सध्या ती अभिनय करीत नाही परंतु सर्व वेळ कुटुंबाला देत आहे.