इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मनोरंजनाचे निखळ साधन म्हणून छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांकडे पहिले जाते. त्यातही कार्यक्रम विनोदी असेल तर मग बघायलाच नको. प्रेक्षकही आपली सगळी दुःख विसरून या कार्यक्रमांमध्ये समरस होऊन जातात. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचे ताणतणाव दूर करून त्यांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’.
कितीही टेन्शन असले तरी त्यातून तुम्हाला खळखळून हसवणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेली १४ वर्ष तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांना हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. त्यातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांसाठी घरातलीच व्यक्ती आहे. आपापली भूमिका साकारण्यासाठी हे कलाकार एका एपिसोडसाठी हजारो रुपये आकारतात. मालिकेतील आत्माराम भिडे ही भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकर यांच्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.
https://twitter.com/TMKOC_NTF/status/1608138953227644936?s=20&t=pApX29vqlDTnF-j2yiVdrw
या मालिकेतील जेठालाल, तारक मेहता यांच्याप्रमाणेच भिडे यांचाही चाहता वर्ग मोठा आहे. पोपटलाल देखील या मालिकेत प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने ते कायमच प्रेक्षकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतात. या मालिकेतील त्यांच्या कामाचं खूप कौतुक होतं. या मालिकेतील एका एपिसोडसाठी ते मोठी रक्कम आकारतात. मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम भिडे यांची भूमिका साकारण्यासाठी मंदार एका एपिसोडसाठी ८० हजार रुपये आकारतात. त्यांचं हे मानधन जेठालाल ही भूमिका साकारत असलेल्या दिलीप दोशी यांच्या मानधनापेक्षाही जास्त आहे. त्यांच्या मानधनाचा आकडा समोर आल्यावर सर्वजण अवाक झाले आहेत.
https://twitter.com/TMKOC_NTF/status/1613777298716786691?s=20&t=pApX29vqlDTnF-j2yiVdrw
TMKOC Actor Mandar Chandwadkar Episode Fees Amount