गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आज आहे दिलीप जोशी (जेठालाल) यांचा वाढदिवस; जाणून घ्या त्यांच्याविषयी सविस्तर…

मे 26, 2022 | 11:11 am
in मनोरंजन
0
jethalal1

 

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली असून अनेक घरांमध्ये ही मालिका नेहमीच बघितली जाते. कारण या मधील जवळपास प्रत्येक पात्र स्वतःच खास आहे. या शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील जेठालालची भूमिका करणारे अभिनेते दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

खरे म्हणजे या भूमिकेसाठी दिलीप जोशी हे काही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती हे फार कमी जणांना माहीत आहे. वास्तविक दिलीपच्या आधी, निर्मात्यांनी एकूण 5 कलाकारांना ही भूमिका ऑफर केली होती, परंतु या सर्वांनी जेठालालची भूमिका नाकारली. आता जाणून घेऊ या कोण आहेत हे कलाकार?

योगेश त्रिपाठी
‘भाबीजी घर पर हैं’ आणि ‘हप्पू की उल्टान पलटन’ या कॉमेडी शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या योगेश त्रिपाठीला कोण ओळखत नाही? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी जेठालालच्या भूमिकेसाठी योगेशशी संपर्क साधला होता. एकाच वेळी अनेक प्रकल्प हाती घ्यायचे नसल्याने योगेशने ही भूमिका करण्यास नकार दिला.

किकू शारदा
किकू शारदा ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून खूप धमाल करत आहे. किकूलाही जेठालालच्या भूमिकेची ऑफर मिळाली आहे. मात्र स्टँड-अप कॉमेडियनच्या भूमिकेत खूश असल्याने किकूने शोची ऑफर नाकारली होती.

एहसान कुरेशी
एहसान कुरेशी हा देखील एक स्टँड-अप कॉमेडियन आहे आणि त्याच्याशी देखील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी संपर्क साधला होता. परंतु एहसानने जेठालालची भूमिका का नाकारली? ही बाब आजपर्यंत स्पष्ट झालेली नाही.

अली असगर
‘कहानी घर घर की’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये दिसलेल्या अली असगरलाही खूप मागणी आहे. जेठालालच्या भूमिकेसाठी अली असगरलाही अप्रोच करण्यात आले होते. अली असगरनेही त्याच्या जुन्या व्यावसायिक बांधिलकीमुळे ही भूमिका नाकारली.

राजपाल यादव
राजपाल यादव बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे. राजपाललाही जेठालाल बनण्याची संधी मिळाली, पण त्याने ही भूमिका नाकारली. कारण राजपालला फक्त त्याच्या बॉलिवूड करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

दरम्यान, या 5 कलाकारांनंतर अखेर निर्माते दिलीप जोशींकडे या भूमिकेची ऑफर घेऊन गेले. दिलीप जोशी यांनी घाईघाईने ही मालिका करायला होकार दिला. गेली अनेक वर्षं दिलीप जोशींना जेठालाल मुळे आनंद मिळतोय आणि प्रेक्षकांनाही ही भूमिका आवडते की या भूमिकेत दुसऱ्या कोणाची तरी कल्पना करणे अवघड नसून अशक्य आहे.

एवढे घेतात मानधन
एका भागासाठी दिलीप जोशी हे तब्बल दीड लाख रुपये मानधन घेतात. ते या कार्यक्रमातील सर्वात महागडे अभिनेते आहेत. त्यांच्याखालोखाल नंबर लागतो तो तारक मेहता अर्थात शैलेश लोढा यांचा. त्यांना प्रति भाग १ लाख मानधन मिळते. तर आत्माराम तुकाराम भिडे म्हणजे मंदार चंदावडकर यांना ८० हजार तर सगळ्यांची लाडकी बबिता म्हणजेच मुनमून दत्ता हिला ५० हजार मिळतात.
दिलीप जोशी हे त्यांचा कॉमेडी सेन्स आणि टायमिंगसाठी ओळखले जातात. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शो मध्ये तारक मेहता कार्यक्रमाचे निर्माते असीतकुमार मोदी यांनी याबद्दल सांगितले होते. दिलीप जोशी हे आमचे ओपनिंग बॉलर, बॅट्समन, शो चे कॅप्टन असे सारे काही आहेत. तर टीआरपी बद्दल ते म्हणाले की, आजही लोकांना हा कार्यक्रम फार आवडतो. त्यामुळेच याचा रिपीट टेलिकास्टही लोक आवडीने पाहतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘सर्व मशिदींचे उत्खनन करा, शिवलिंग सापडले तर आमचे, मृतदेह सापडले तर तुमचे’, भाजप नेत्याचे ओवेसींना आव्हान

Next Post

मोदी सरकारला आज ८ वर्षे पूर्ण: नोटाबंदीपासून कलम ३६० पर्यंत मोदी सरकारने घेतले हे ८ मोठे निर्णय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
narendra modi

मोदी सरकारला आज ८ वर्षे पूर्ण: नोटाबंदीपासून कलम ३६० पर्यंत मोदी सरकारने घेतले हे ८ मोठे निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011