विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या खासदार नुरसत जहाँ या देशभरातच लोकप्रिय आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीतही त्या विशेष चर्चेच्या ठरल्या होत्या. आताही त्या चर्चेच्या कारण ठरल्या आहेत. आता निमित्त आहे ते त्यांचे पती निखिल जैन यांच्या वैवाहिक जीवन आणि दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांचे. जाणून घेऊ या हा वाद आणि हे प्रकरण नेमके काय आहे…
विधानसभा निवडणूक आटोपल्यावर पश्चिम बंगालमध्ये खासदार नुसरत जहाँच्या लग्नाच्या मुद्यावरून उठलेले वादळ चर्चेत आहे. तसे बघितले तर लग्न आणि घटस्फोट हे प्रत्येकाचे व्यक्तिगत प्रश्न आहेत. मात्र सेलिब्रिटींचे अफेयर असो, विवाह असो वा ब्रेक-अप, ते कायम चव्हाट्यावरच येतात. सध्या नुसरत जहाँचेही तसेच झाले आहे. नुशसत आणि निखील जैन यांच्यात सध्या चागंलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
निखील जैन सोबत तुर्कीमध्ये लग्न केले आणि या लग्नाला भारतात मान्यता नाही, असे नुसरत जहाँने स्पष्ट केले होते. हा एक आंतरधर्मिय विवाह असून त्यासाठी भारतात वेगळ्या तरतुदी आहेत. त्यामुळे आमच्यात अधिकृत विवाह झालेलाच नव्हता, असे तिने म्हटले आहे. यावर संसदेत निखील जैन सोबत लग्न झाल्याचे मान्य केले होते, ते खोटे होते का, असा सवाल भाजपच्या लोकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आता या प्रकरणात राजकारणानेही उडी मारली आहे.
निखील जैनने मात्र आपण अनेकदा विवाह नोंदणी करून घेऊ, असा आग्रह केल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी नूशरतने पतीवर संपत्तीचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप केला होता. त्याला आता निखीलने उत्तर दिले आहे. तो म्हणतो की, आमच्यात पती-पत्नीसारखे संबंध होते. आम्ही दोघेही या नात्यात आनंदी होतो. पण सात महिन्यांपूर्वी काहीतरी झाले आणि सारे काही बदलले. निखीलने आर्थिक फसवणूक झाल्याच्या नुसरतच्या आरोपांनाही फेटाळून लावले आहे. उलट नुसरतनेच धोका दिल्याचे तो म्हणतोय.
निखील यांचा खुलासा
नुसरतच्या आरोपांनंतर निखीलने एक अधिकृत खुलासा प्रसिद्ध केला आहे. त्यात तो म्हणतो, ‘माझे नुसरतवर प्रेम होते आणि त्यातूनच लग्नासाठी प्रपोज केले. जून-२०१९ मध्ये आम्ही तुर्कीमध्ये लग्न केले. त्यानंतर कोलकात्याला शाही रिसेप्शन झाले. एका विश्वासू पतीच्या नात्याने माझा वेळ, पैसा आणि संपत्ती नुसरतला सोपवली. कुठल्याही अटींशिवाय तिला सहकार्य केले. मात्र लग्नाच्या काही दिवसांतच तिच्यात बदल होऊ लागला.
ऑगस्ट-२०२० मध्ये तिने एका चित्रपटाचे शुटींग केले. त्यानंतरच तिच्यात बदल झाला. मी तिला वारंवार विवाह नोंदणी करून घेण्याचा आग्रह करीत होतो, पण ती प्रत्येकवेळी टाळत गेली.’ ५ नोव्हेंबर २०२० ला नुसरतने घर सोडले. त्यानंतर वाद निर्माण झाला. पण आमचे नाते भारतीय कायद्यानुसार लिव्ह-इन मध्ये मोडले जाते, असेही विधान केले होते.
कुणासोबत फिरायची नुसरत?
नुसरतच्या सततच्या बाहेर फिरण्यावरून निखीलने गंभीर आरोप केले आहेत. ती कुणासोबत फिरायची, याबाबत तो काहीच बोललेला नाही, मात्र त्यामुळे आपण अस्वस्थ असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे धोका झाल्याची भावना त्याच्या मनात आली आणि ८ मार्च २०२१ ला नुसरत विरुद्ध खटला दाखल केला. यात लग्न रद्द करावे, अशी विनंती त्याने केली आहे.