पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी व महायुतीला धक्का देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन महाशक्तीच्या आघाडीची बैठक आज पुण्यात संपन्न झाली. या बैठकीत १५० जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर जागांवरही लवकरच निर्णय होईल असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी परिवर्तन आघाडी तर्फे सांगण्यात आले की, मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील आमचं बोलणं सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु आहे. त्याचप्रमाणे महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात ही तिसरी आघाडी म्हणून ओळखली जाणार आहे. तर मनसे स्वतंत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे राज्यात चौरंगी लढत प्रमुख पक्षांची होईल.