मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी देशभरातील लाखो भाविक गर्दी करतात. विशेष म्हणजे विदेशातून येणाऱ्या भारतीय भाविकांची संख्याही खूप जास्त असते. पण प्रत्येकवेळी मोठी रांग आणि गर्दीचा सामना भाविकांना करावा लागतो. पण देवस्थानाने ऑनलाईन तिकीट बुकींगची व्यवस्था करून बाहेरून येणाऱ्यांची सोय केली आहे.
दर्शनासाठी विशेष पासकरिता ऑनलाईन बुकींग सुरू झाले असून १२ ते ३१ जानेवारी व संपूर्ण फेब्रुवारी महिना त्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. ९ जानेवारीपासून देवस्थानाच्या संकेतस्थळावर अॉनलाईन बुकींगचा कोटा जाहीर झाला आहे. विशेष दर्शनासाठी ३०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. पण कोटा नेमका किती असेल, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही, त्यामुळे भाविकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच देवस्थानाने तिकीटांची संख्याही सांगितलेली नाही. कोरोनाचे संकट घोंघावत असताना बुकींगच्या भरवश्यावर गर्दी करणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.
असे करा बुकिंग
तिरमला तिरुपती देवस्थानाच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर तिथे तुम्हाला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईलवर येणारा ओटीपी सबमीट करावा लागेल. लॉगईन झाल्यावर पुढे दिसणाऱ्या कॅलेंडरवर दिवस निवडायचा आहे. त्यानंतर सविस्तर माहिती भरायची आहे.
गर्दी वाढली
कोरोनाच्या नियमांमध्ये सरकारने शिथिलता दिल्यानंतर तिरुपती देवस्थानात येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढलेली आहे. गेले सहा महिने ही संख्या खूप जास्त बघायला मिळत आहे. त्यापूर्वी जवळपास दोन वर्षे भाविकांची संख्या अत्यंत कमी होती. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर मंदिर बंदच होते.
https://twitter.com/TTDevasthanams/status/1611989043096715264?s=20&t=i3H7s6tj8mwJoR-d5lynHg
Tirupati Tirumala Darshan Booking Online Pass