इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने चार भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मल्लिका नावाच्या एका महिलेचा समावेश आहे. या घटनेमंतर तिरुपती पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. दर्शन घेण्यासाठी पास घेण्यासाठी तब्बल ४ हजार भाविक उभे होते.
बुधावारी सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनसाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत उभे असतांना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्यात चार भाविकांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मंदिर समितीचे चेअरमन बीआर नायडू यांनी आपातकालीन बैठक बोलावली आहे. त्यांनी फोनवरुन अधिकाऱ्यांशी बातचित करुन घटनेची माहिती जाणून घेतली आहे.