नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डी विमानतळावर कमी दृष्यमानतेमुळे तिरुपती – शिर्डी विमानाला लॅडिंग करण्यास अडचणी आल्या. त्यामुळे हे विमान नाशिकच्या ओझर विमानतळावर उतरवण्यात आले. तिरुपतीहून हे विमान उशिरा निघाले होते. त्यामुळे शिर्डी विमानतळावर दुपारी ४:३० ला पोहचणारे हे विमान ६ वाजता पोहचले. तब्बल दीड तास उशिरा आलेल्या या विमानाला कमी दृष्यमानतेमुळे लॅडिंग करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे हे विमान बराच काळ घिरट्या घातल होते. त्यानंतर हे विमान नाशिक येथील ओझर विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना नाशिकहून गाडीने शिर्डीत आणले गेले. या सर्व घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. विमानतळावर नाईट लँडिंगचे काम अपूर्ण असल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.