इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिरात दिल्या जाणा-या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर आता प्रसादाच्या चाचणीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये चरबीचा आणि फिश ऑइलचे अंश आढल्याचे नमूद करण्यात आल्याचा दावा सत्ताधारी तेलगु देसम पार्टीने केला आहे.
तेलगु देसम पार्टीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत गुजरामधील प्रयोगशाळेत या प्रसादाची तपासणी केल्यानंतर अहवाल आल्याचे सांगितले. या लाडूमध्ये जे तुप वापरण्यात येते. त्या तुपात चरबीचे अंश सापडले असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे नमुने ९ जुलै २०२४ आणि १६ जुलै रोजी घेण्यात आले होते.
दरम्यान मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसवर आरोप केले होते. त्यांच्या काळात हा वापर होत होता असे त्यांनी सांगितले. दरम्यान वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांची बहीण आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वायएस शर्मिला यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. या प्रकरणात राजकारण होत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार वाय.बी सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या आरोपाने भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हटले आहे.