विशेष प्रतिनिधी, नागपूर
गुबगुबीत गाल नेहमीच चेहऱ्याचे आकर्षण वाढवत असतात. खूप जास्त वर्कआऊट केल्यामुळे शरीर तर सुडौल दिसायला लागते पण चेहऱ्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. शरीरावर परिणाम होऊ न देता तुम्ही गाल गुबगुबीत करू इच्छिता तर त्यासाठी काही टिप्स आज आम्ही देणार आहोत. ते नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत.
गाल गुबगुबीत करण्यासाठी फुगे फुगवायचा व्यायाम करा. त्याने फप्फुसांसाठी तर फायद्याचेच आहे, सोबत गालांसाठीही एक उत्तम व्यायाम आहे. फुग्यांमध्ये हळूहळू हवा भरा. जवळपास एक मिनीटापर्यंत हवा भरत राहा. पण जास्त वेगाने केले तर थकवा येण्याची शक्यता आहे. दररोज ४ ते ५ वेळा हा व्यायाम नक्की करा. लवकरच त्याचे चांगले परिणामही तुम्हाला बघायला मिळतील.
फेशियल व्यायाम
अनेक प्रकारचे फेशियल योगाही यात यशस्वी सिद्ध झाले आहेत. फिश फेस बनवून हसण्याचा प्रयत्न करा. तोंड उघडा आणि बंद करा. जिभेने नाकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. सिलींगकडे बघून तोंडातील घास चावण्याची एक्टिंग करा. हा सारा व्यायाम दिवसातून पाच ते सहा वेळा करा. यामुळे कोलेजन आणि इलास्टिन तयार करण्यास मदत होते.
हेल्दी डायटची महत्त्वाची भूमिका
गुबगुबीत गालांसाठी आपला आहारही तेवढाच महत्त्वाचा आहे. हेल्दी डायटचा सरळ आणि सर्वाधिक वेगाने परिणाम आपल्या चेहऱ्यावरच बघायला मिळतो. अंडी, फळं, डाळी, बिन्स आदी यात अत्यंत फायदेमंद ठरतात. नैसर्गिक पद्धतिने गाल गुबगुबीत करण्यासाठी दररोज ओट्स, पनीर, दुध, गाजर, सफरचंद, बदाम आणि हेल्दी फॅट खायला हवेत. या साऱ्या गोष्टी दोन ते तीन आठवडे नियमीत केल्या तरच त्याचा परिणाम बघायला मिळेल.