मुंबई – बेरचदा फेसबुकवरचा व्हिडीओ खूप आवडतो, पण तो फक्त शेअरच करता येतो. त्याला डाऊनलोड करण्याचा कुठलाच पर्याय आपल्याला सापडत नाही. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज असते. मात्र ते आता फार अवघड राहिलेले नाही. आपण आता फेसबुकवरून व्हिडीओ डाऊनलोड करण्याचे मार्ग जाणून घेऊया.
आता सोशल मिडीयावर अनेक अॅप आले आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपण फेसबुकवरील व्हिडीओ सेव्ह आणि डाऊनलोड करू शकतो. मात्र हे अॅप डाऊनलोड करताना तुम्हाला सावध राहणे व काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बरेचदा डिव्हाईस सिक्युरिटीशी आपण तडजोड करून बसतो. सुदैवाने डेस्कटॉप आणि मोबाईलवर एक सरळ साधा मार्ग आहे. ज्याचा अवलंब करून तुम्ही व्हिडीओ डाऊनलोड करू शकता. ऑफलाईनही बघू शकता. त्यासाठी वेगळ्या अॅपची आवश्यकता नाही. त्यासाठी काही मोजक्या स्टेप्समधून जावे लागेल.
डेस्कटॉपवर कसा डाऊनलोड करावा?
– ब्राऊजरमध्ये फेसबुक सुरू करा. जो व्हिडीओ डाऊनलोड करायचा आहे तो शोधा
– व्हिडीओवर क्लिक करा आणि सुरू झाल्यावर उजवीकडे तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा
– त्यात कॉपी लिंकचे ऑप्शन निवडा
– ही लिंक नव्या ब्राऊजरमध्ये उघडा. जर ‘fb.watch’ लिंकच्या रुपात छोटे करणे शक्य असेल तर एंटर दाबा, जेणेकरून लिंक मोठी होईल.
– अॅड्रेस बारमध्ये युआरएला https://www वरून https://mbasic यात बदला.
– एंटर दाबा आणि नंतर व्हिडीओवर राईट क्लिक करा आणि ओपन लिंक इन न्यू टॅबचा पर्याय निवडा.
– नव्या टॅबमध्ये येणाऱ्या व्हिडीओवर राईट क्लिक करा. त्यानंतर व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी आणि डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी सेव्ह व्हिडीओ अॅज हा पर्याय निवडा
मोबाईलसाठी हा आहे पर्याय
– अँड्रॉईड, आयओएसवरून फेसबुकवरचे व्हिडीओ डाऊनलोड करण्यासाठी वेगळा मार्ग आहे. यासाठी www.fbdown.net हा एक उत्तम मार्ग आहे.
– मोबाईलमध्ये फेसबुक अॅप उघडा.
– जो व्हिडीओ डाऊनलोड करायचा आहे. तो शोधा आणि त्याच्या उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करा
– कॉपी लिंकचा पर्याय निवडा
– नंतर नव्या ब्राऊजरमध्ये fbdown.net उघडा व लिंक पेस्ट करा
– डाऊनलोड बटणवर क्लिक करा आणि नॉर्मल किंवा हाय क्वालिटीचा पर्याय निवडा
– नंतर फेसबुक व्हिडीओ दाखविणारे पेज उघडेल. त्यावर क्लिक करून ठेवा, म्हणजे “Download video” चा पर्याय मिळेल.