येवला ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येवल्यातील शेतक-यांवर आली आहे. दिवाळीपूर्वी सतत झालेल्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवले टोमॅटो हातचे गेले आहे. पाऊस असतांनाच टोमॅटोची खुडणी होऊ शकली नव्हती. पर्यायाने टोमॅटो झाडावरच पिकून लाल झाल्याने त्याचा बाजारात विक्रीला घेऊन जाऊन सुध्दा उपयोग नव्हता. त्यामुळे पिकलेल्या मालाला बाजारपेठेत जास्त मागणी नसते, त्यामुळे भाव सुध्दा मिळत नाही. आणि तोडणी आणि वाहतूकीचा खर्च त्यातून वसूल होत नसल्याने शेतक-यांनी रस्त्यावरच टोमॅटो फेकून दिले.