टीम इंडिया दर्पण
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण हाच अंतिम उपाय असताना एक आठवडा होऊनही १८ ते ४४ वर्षांच्या लोकांना लसीसाठी टाइम स्लॉट उपलब्ध होऊ शकत नाहीये. राज्यांकडे लसींच्या डोसचा तुटवडा असल्याने जास्तीत जास्त केंद्रांवर मर्यादित वेळेसाठी नोंदणी होत आहे. त्यामुळे प्रत्येकाला लस मिळू शकत नाहीये. दिल्लीसह सर्वच शहरे आणि राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. परिणामी नोंदणी झालेल्या लोकांचेही लसीकरण होऊ शकलेले नाही.
आरोग्य मंत्रालयानुसार, गेल्या एका दिवसात २३ लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी २.६७ लाख लोक १८ ते ४४ वर्ष वयाचे होते. आतापर्यंत देशात १६.४९ कोटी लोकांचे लसीकरण झालेले आहे. जवळपास ९५ लाख आरोग्य कर्मचार्यांनी लस घेतलेली आहे. देशातील दहा राज्यातच ६७ टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. देशात कोरोना लसीकरण सुरू होण्यास १११ दिवस पूर्ण झालेले आहेत. गेल्या दिवसात १८,९३८ केंद्रांवर लसीकरण करण्यात आलेले आहे. लस घेतलेल्या लोकांपैकी १०.६० लाख लोकांनी पहिला डोस आणि १३.१० लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.
११.८० लाख युवकांना लस
एक ते सहा मेदरम्यान देशात ३० राज्यांमध्ये ११.८० लाख युवकांना लस देण्यात आली आहे. अंदमान आणि निरोबार बेट समुहांवर ३३०, आंध्र प्रदेश १६, आसाम २२०, बिहार २८४, चंदीगढ २, छत्तीसगड १,०२६, दिल्ली १,८३,६७९, गोवा ७४१, गुजरात २,२४,१०९, हरियाणा १,६९,४०९, हिमाचल प्रदेश १४, जम्मू २१,२४९, झारखंड ७७, कर्नाटक ७,०६८, केरळ २२, लडाख ८६, मध्य प्रदेश ९,८२३, महाराष्ट्र २,१५,२७४, मेघालय २, नागालँड २, ओदिशा २८,३२७, पुद्दुचेरी १, पंजाब २,१८७, राजस्थान २,१८,७९५, तामिळनाडू ८,४१९, तेलंगणा ४४०, त्रिपुरा २, उत्तर प्रदेश ८६,४२०, उत्तराखंड १७ आणि पश्चिम बंगालमध्ये २,७५७ डोस युवकांना देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत ९५,०१,६४३ आरोग्य कर्मचार्यांना पहिला डोस देण्यात आलेला आहे. ६३,९२,२४८ आरोग्य कर्मचार्यांनी दुसरा डोस घेऊन कोर्स पूर्ण केला आहे. त्याशिवा. १,३७,६४,३६३ फ्रंटलाइन वर्करनी पहिला आणि ७५,३९,००७ वर्करनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४५ वर्षांच्या ११,८०,७९८ लोकांना लस देण्यात आली आहे.