नवी दिल्ली – टाटा मोटर्सने अखेर स्थानिक बाजारात Tigor EV या आपल्या दुसर्या इलेक्ट्रिक कारला लाँच केले आहे. जिप्ट्रॉन तंत्रज्ञानासोबत आकर्षक लूक आणि दमदार इलेक्ट्रिक मोटरने सजलेल्या या कारला तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आले आहे. कंपनीने या विशेष जिप्ट्रॉन तंत्रज्ञानाचा वापर Tata Nexon मध्ये केला होता. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार फक्त ५.७ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितासाचा वेग पकडू शकते.
या कारच्या एंट्री लेवल XE+ व्हेरिएंटची किंमत ११.९९ लाख रुपये, XM व्हेरिएंटची किंमत १२ लाख रुपये, XZ+ ची किंमत १२.९९ लाख रुपये आणि ड्युअल टोन पेंट स्किमसोबत येणार्या XZ+ (DT) या टॉप व्हेरिएंटची किंमत १३.१४ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही कार दोन रंगात सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये सिग्नेचर टिल आणि डेटोना ग्रेचा समावेश आहे.
नव्या Tigor EV मध्ये सर्वात मोठा अपडेट पावरट्रेनच्या आघाडीवर पाहायला मिळत आहे. कंपनीच्या Ziptron EV पावरट्रेनने सज्ज करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वात आधी Nexon इलेक्ट्रिकमध्ये करण्यात आला होता. इलेक्ट्रिक मोटर ७५ एचपीची पावर आणि १७० एनएम चा पिक टॉर्क निर्माण करते.
या कारमध्ये २६ kWh च्या क्षमतेचे लिथिअम इऑन बॅटरी बसविण्यात आली आहे. IP67 पाणी आणि वातावरणाशी रक्षित आहे. कंपनीकडून ८ वर्षे आणि १,६०,००० किमीपर्यंत वॉरंटीसुद्धा देण्यात येत आहे. कार सिंगल चार्चमध्ये ३०६ किमीपर्यंत चालवली जाऊ शकतो. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून (एआरएआय) प्रमाणित करण्यात आले आहे.
फिचर्समध्ये या कारमध्ये अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसोबत जोडला जाणारा ७.० इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, ४ स्पिकर आणि ४ ट्विटर, iRA कनेक्टेड कार तंत्रज्ञान, मल्टिफंक्शन स्टिअरिंग व्हिल, स्वयंचलित वातावरण नियंत्रण, डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि बरेच काही कारमध्ये मिळणार आहे. कारमध्ये सुरक्षेसाठी दोन एअरबॅग, ईबीडीसोबत एबीएस, रिअर पार्किंग सेंसर, रिअर पार्किंग कॅमेरा, सीट बेल्ट रिमांडर देण्यात आला आहे.