विशेष प्रतिनिधी, मुंबई
गेल्या काही दिवसांपासून बदलत्या वातावरणाला तोंड देणाऱ्या महाराष्ट्राला आज पुन्हा अवकाळी पावासाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही तासातच जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, वादळी वारा आणि मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार गारपीटही होण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1389155969985253376