इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी आपण विविध अपघात बघतो. आताही असाच एक मोठा अपघात झाला आहे. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून दुचाकीचालक बालंबाल बचावला आहे. काही मिनिटे वाचविण्यासाठी दुचाकी पुढे नेणारा चालक रेल्वे क्रॉसिंगवर थेट रेल्वेच्या समोरच आला. त्यानंतर काय घडले हे दाखविणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. रेल्वेखाली चिरडण्यापासून हा दुचाकीचालक अक्षरशः बचावला. त्याचा हा व्हिडिओ आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र अकलेकर यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. बघा हा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/rajtoday/status/1493129784314175489?s=20&t=BZvPC4CwBKaves83izXQQw