मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – आग्रा महामार्गावर संध्याकाळच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार पहावयास मिळाला. नाशिक – मालेगाव दरम्यान ही घटना घडली. ट्रक मुंबईहून धुळ्याकडे जात असताना अचानक त्यात आग लागली आणि काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ट्रक पूर्ण जळून खाक झाला. सुदैवाने चालक आणि क्लीनर वेळीच बाहेर पडल्यामुळे त्यांचे जीव वाचले..