मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकमान्य टिळक टर्मिनस – जय नगर पवन एक्स्प्रेसमध्ये एका माथेफिरूने सहप्रवाश्यांवर लादी पुसण्यासाठी वापरण्यात येणारे अॅसिडसदृष्य पदार्थ फेकल्याने दोन प्रवाशी जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार लासलगाव – मनमाड रेल्वे स्थानाकादरम्यान घडला. गाडी मनमाड स्थानकात येताच माथेफिरूला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचऱयांवर त्याने ज्वलनशील पदार्थ फेकल्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचाऱ्यांसह मदतीसाठी गेलेल्या खाद्यपदार्थ विक्रेतेही जखमी झाले. या गदारोळात गाडी सुमारे २० मिनिटे मनमाड स्थानकात उभी होती. रेल्वे सुरक्षा बलाने माथेफिरूला ताब्यात घेतले असून,बिहार येथील धनेश्वर यादव असे त्याचे नाव असून तो गाडीत सफाईचे काम करीत असतो. या घटनेचा सखोल तपास रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग अधिक करीत आहे.