येवला – तालुक्यातील अंदरसुल सायगाव रोडलगत विजेचा शॉक लागून तीन मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. या भागात एका डीपीच्या लोखंडी पोलला विद्युत सप्लाय उतरल्यामुळे या मेंढ्याचा मृत्यू झाला. या मेंढ्या चरत असतांना पोलजवळ गेल्या त्यानंतर त्यांना शॅाक बसला. अंदरसुल येथील मेंढपाळ विठ्ठल जानराव या मेंढपाळाच्या या तीन मेंढ्या होत्या. त्यांनी सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे या तीन मेंढ्याचा मृत्यू झाला असून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जानराव यांनी केली आहे.