नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी गावात रविवारी दुपारी कैलास त्रिंबक ढेमसे यांच्या मळ्यात बिबट्याचे तीन पिल्लू मिळाले. हे पिल्लू किती दिवसाचे आहे. ते केव्हापासून या भागात होते. याची माहिती मात्र मिळाली नाही. या पिल्लूना वनविभागाच्या ताब्यात सुरक्षितरित्या देण्यात आले. उपवनसंरक्षक विभागाच्या पश्चिम भागाचे पंकजकुमार गर्ग यावेळी उपस्थितीत होते. गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर शहरी भागात वाढला आहे. त्यात हे पिल्लू मिळाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या पिल्लूला शोधण्यासाठी बिबट्या गावाकडे येईल ही भीती काही गावक-यांनी व्यक्त केली.