सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील डोंगरगाव परिसरात हरणांच्या कळपाकडून होणाऱ्या पिकांच्या नासाडी बद्दल अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. संतोष गोपीनाथ सोमवंशी या तरुण शेतकऱ्याची तीन एकर सोयाबीन हरणांच्या टोळक्याने फस्त केली आहे. त्यामुळे हाती फारसे काही लागणार नसल्याने उरलेल्या सोयाबीनच्या झाडांवर शेतकऱ्यांने नांगर चालून संताप व्यक्त केला आहे.
लागवडी साठी ५० हजार रुपये खर्च झाला, पीक राहिले असते तर सोयाबीन विक्रीतून येणाऱ्या २ लाख ५० हजार रुपये मिळू शकले असते. मात्र पिकच फस्त झाल्याने वन विभागाने त्वरित हरणांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला नुकसान भरपाई तरी द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांना केली आहे.