नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा व सत्र न्यायालयाने अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीकडे पैश्यांची मागणी करणा-या आरोपीस नऊ महिने पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सोहम प्रवीण वनमाळी (वय २१, रा. विश्वभारती अपार्टमेंट, टाकळीरोड) असे आरोपीचे नाव आहे. नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला होता. इंदिरानर पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या या गुन्ह्याची एक वर्षात अंतिम सुनावणी पूर्ण झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. भालेराव यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.
याप्रकरणी विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) अंतर्गत इंदिरानर पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. सी. बारेला यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे शिरीष जी. कडवे यांनी युक्तीवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक एस. एस. गायकवाड, हवालदार पी. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.
अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले
टाकळीरोड भागात राहणा-या सोहम वनमाळी याची राजीवनगर भागातील अल्पवयीन पीडितेशी मैत्री झाली होती. तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आरोपीने तिला विश्वासात घेतले. स्वत:ची लैगिंक इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधली. स्वत:च्या व्हॉटसअॅप क्रमांकावरून पीडितेला अश्लील मेसेज पाठवून व्हिडिओ कॉल केले. यानंतर नग्नावस्थेत पीडितेलाही अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. संशयिताच्या सांगण्यानुसार कृत्य न केल्यास आणि पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या पीडितेने कुटुंबीयांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार समोर आला होता. मुलीच्या आईने इंदिरानगर पोलिसांत धाव घेतल्याने