मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात फ्रिज, वॉशिंग मशीन आणि काही प्रमाणात एसी या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आवश्यक वस्तू मानल्या जातात. कारण अनेक घरांमध्ये पती, पत्नी दोघे जण नोकरी करतात, वास्तविक दोघेजण नोकरीला असो की एक जण फ्रीज आणि वाशिंग मशीन या आवश्यक वस्तू बनल्या आहेत. कारण फ्रिजमध्ये भाजीपाला, फळे, दूध सह अन्य पदार्थ साठवून ठेवणे सहज शक्य होते, तर वॉशिंग मशीन मुळे कपडे सहज स्वच्छ होतात. तसेच वाढत्या उष्मतामानामुळे अनेक जण पंखे आणि कुलर प्रमाणेच आता एसीला देखील पसंती देतात, त्यामुळे घरे काही प्रमाणात थंड राहतात.
सध्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या काळात वेळ आणि कामकाज यांची गणिते सांभाळण्यासाठी या वस्तू उपयुक्त ठरतात. मात्र आता या वस्तूंच्या किमती नव्या वर्षात पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांनी कच्चा माल आणि मालवाहतुकीचे शुल्क वाढविल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यानंतर एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्सच्या किमती नवीन वर्षात वाढल्या आहेत. याशिवाय या महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चपर्यंत वॉशिंग मशीनच्या किमती पाच ते दहा टक्क्यांनी वाढू शकतात.
Panasonic, LG, Haier यासह अनेक कंपन्यांनी आधीच किमती वाढवल्या आहेत, तर सोनी, हिताची, गोदरेज अप्लायन्सेस या तिमाहीच्या अखेरीस दरवाढीचा निर्णय घेऊ शकतात. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SIEMA) नुसार, उद्योग जानेवारी ते मार्च या कालावधीत किंमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढवेल, असा अंदाज आहे.
कमोडिटीच्या किमती, जागतिक मालवाहतूक शुल्क आणि कच्च्या मालाच्या किमतीत झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेऊन कंपन्यांनी उत्पादनांच्या किंमती रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि एअर कंडिशनरमध्ये तीन ते पाच टक्क्यांनी वाढवल्या आहेत. श्रेणी वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत.
पॅनासोनिकने आपल्या एसीच्या किंमती आधीच आठ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. एसीच्या किमतींमध्ये आणखी वाढ वस्तूंच्या किमती आणि पुरवठा साखळीत आणखी वाढ झाल्यामुळे होऊ शकते. दक्षिण कोरियातील ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG ने गृहोपयोगी वस्तूंच्या श्रेणीत किमती वाढवल्या आहेत. कच्चा माल आणि लॉजिस्टिकच्या किमतीत झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे.
कंपन्यांचे म्हणणे आहे की, नाविन्यपूर्ण उपाययोजनांद्वारे खर्च स्वतःहून भरून काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे, परंतु व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी किंमतीत वाढ आवश्यक आहे. तर किंमतीत वाढ करणे अपरिहार्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच कच्चा माल, कर आणि वाहतूक यासह उत्पादन खर्च वाढला आहे. अशा परिस्थितीत, ब्रँड एप्रिलपर्यंत किंमती 10 टक्क्यांनी वाढवेल. टप्प्याटप्प्याने एप्रिलपर्यंत आम्ही किमान आठ ते दहा टक्के भाव वाढवू, असे कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
उद्योगाने सणासुदीच्या हंगामामुळे दरवाढ पुढे ढकलली होती. मात्र आता दरवाढ करण्याशिवाय संबंधित कारखानदारांकडे पर्याय नाही. जानेवारी ते मार्च या काळात उद्योग पाच ते सात टक्क्यांनी भाव वाढवतील, असेही त्यांनी सांगितले. एकंदरीत या वस्तूंच्या उत्पादक कंपन्या, कारखानदार आणि उद्योजक यांचे म्हणणे आणि अडचणी काही असल्या तरी याचा फटका ग्राहकांना बसणार हे मात्र निश्चित.