इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – या वर्षातील पहिले चंद्रग्रहण उद्या (१६ मे) रोजी होत आहे. या काळात चंद्र हा ब्लड मून (रक्तासारखा लाल) दिसणार आहे. चंद्र पांढऱ्या रंगाचा असताना रक्तासारखा लाल का दिसेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात खगोल शास्त्रज्ञांनी सविस्तर माहिती दिली आहे.
चंद्रग्रहण म्हणजे?
जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते आणि चंद्र पृथ्वीने पूर्णपणे झाकला जातो तेव्हा तो लाल दिसतो. म्हणजे, पृथ्वीच्या सावलीने चंद्र झाकला जातो. यंदाचे चंद्रग्रहणावेळी सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीवर पडेल. त्याचवेळी पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडेल. शिवाय पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर कमी असेल. त्यामुळे चंद्र हा अतिशय तेजस्वी आणि लाल रंगाचा दिसून येईल. त्यालाच ब्लड मून असे म्हणतात. १६ मे चे चंद्रग्रहण हे संपूर्ण आहे.
चंद्र ग्रहणाचा काळ
सकाळी ८ वाजून ५९ वाजता ग्रहणाला प्रारंभ होईल. हे ग्रहण सकाळी १० वाजून २३ मिनिटांपर्यंत असेल.
भारतात दिसेल का?
वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. मात्र. चंद्रग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये ते दिसेल.