नवी दिल्ली – सध्या आपल्याकडे पावसाळा सुरू आहे. पण, जगातील असे एक गाव आहे जेथे आजवर कधीच पडलेला नाही. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. या गावात खरंच आजवर पावसाने हजेरी लावलेली नाही.
मेघालयातील मसिनराम खेड्यांत जगात सर्वाधिक पाऊस पडतो, तसेच जगभरात अशी अन्य काही ठिकाणे आहेत, जिथे वर्षभर सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु काही ठिकाणी कधीतरी थोडाफार पाऊस पडतोच. मात्र अजिबातच पाऊस पडत नाही किंवा पाऊस पडलेले नाही असे ठिकाण कोणी ऐकले आहे का? विशेष म्हणजे या ठिकाणी वाळवंट नाही. उलट गावात वस्ती असून अनेक लोक राहतात. विशेष म्हणजे येथे जगभरातील पर्यटक देखील दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. कोणते आहे हे गाव जाणून घेऊ या…
येमेन देशाची राजधानी सानाच्या पश्चिमेस मानख प्रांताच्या हाराज भागात ‘अल-हुताईब ‘ नावाचे एक गाव आहे. येथे दरवर्षी अनेक पर्यटक येतात आणि नेत्रदीपक दृश्यांचा आनंद घेतात. या गावात पर्वताच्या शिखरावर अनेक सुंदर घरे बांधली गेली असून तेथे लोक राहतात.
अल-हुताईब हे गाव पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३२०० मीटर उंचीवर आहे. या गावातली सर्वात खास गोष्ट म्हणजे इथे कधीही पाऊस पडत नाही. याचे कारण हे गाव ढगांच्या क्षेत्राच्यावर वसलेले आहे. या खेड्यात ढग तयार होतात आणि पाऊस खाली पडतो. गावात मात्र पाऊस च पडत नाही. इथले अनोखे दृश्य असे आहे की, पर्यटकांनी कुठेही पाहिलेले नसेल.
या गावाच्या आसपासचे वातावरण खरोखर उबदार आहे. मात्र हिवाळ्यात सकाळी वातावरण खूप थंड असते, परंतु सकाळी लोकांना उन्हाचा सामना करावा लागतो. ग्रामीण आणि शहरी वैशिष्ट्यांसह प्राचीन आणि आधुनिक दोन्ही वास्तूंचे मिश्रण करणारे हे गाव आता ‘अल-बोहरा किंवा अल-मुकर्मा’ लोकांचे केंद्र आहे. त्यांना ‘येमेनी समुदाय ‘ असे म्हणतात. येमेनी समुदायाचे हे लोक मुंबईतील मुहम्मद बुरहानुद्दीन यांच्या नेतृत्वात इस्लाम (मुस्लिम) पंथातून आले आहेत. सन २०१४ पर्यंत दर तीन वर्षांनी ते या गावाला भेट देत असत.