इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सुमारे 25 ते 30 वर्षापूर्वी एका हिंदी चित्रपटात विनोदी अभिनेता कादर खान यांच्या तोंडी एक डायलॉग आहे. त्याचा अर्थ असा की, या देशात सर्वसामान्य नागरिकांना सर्वच गोष्टींचा टॅक्स म्हणजे कर भरावा लागतो. ते ज्या गोष्टीचा उपभोग घेतात, त्याचा तर कर असतोच. परंतु ज्या गोष्टींचा उपभोग घेत नाहीत, त्याचा देखील कर त्यांना भरावा लागतो. याचा प्रत्यय सध्या उत्तर प्रदेशातील एका गावातील ग्रामस्थांना येत आहे. वास्तविक पाहता या गावात गेल्या पाच वर्षांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे तरीदेखील गावकऱ्यांना वीज बिल भरावे लागते, ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.
सीतापूर जिल्हा मुख्यालयाला लागून असलेले अहमदनगर गाव पाच वर्षांपासून अंधारात बुडाले आहे. येथील ग्रामस्थ दिवसा घर सोडून फक्त एका ट्रान्सफॉर्मरच्या मागणीसाठी तालुक्याच्या गावी वीज कार्यालयात जातात. दिवस तर निघून जातो, मात्र रात्र रडत- कडत रात्र काढावी लागते, कारण महिला, लहान मुले व वृद्धांची रात्री विजेअभावी अवस्था वाईट झाली आहे. विज नसल्याने रात्री व दिवसा ऑनलाईन अभ्यास होत नसल्याने मुलांचे शिक्षण बंद आहे.
ग्रामस्थ सांगतात की, येथे स्थिती अशी आहे की, उकाड्यामुळे काही ग्रामस्थ रात्रंदिवस शर्ट घालू शकत नाहीत. फक्त बाजारात जाण्यासाठी कपडे घालतात. अनेकजण गाव सोडून शहरात भाड्याच्या घरात राहू लागले. विजेसाठी गावप्रमुख वर्षभरापासून अधिकाऱ्यांच्या दारात चकरा मारत आहेत, मात्र ऐकत नाहीत. तसेच पाच वर्षांपासून ग्रामस्थ ट्रान्सफॉर्मरसाठी झगडत आहेत. विशेष म्हणजे हे गाव हसनपूर वीज उपकेंद्राला जोडलेले आहे. एवढ्या तक्रारी करूनही वीज कार्यकारी अधिकारी हे गाव कोणत्या वीज केंद्राशी जोडलेले आहे याचा शोधही लावू शकले नाहीत. ग्रामस्थांच्या घरी सातत्याने वीज बिले येत आहेत. तसेच 60 टक्के नागरिकांचे कनेक्शन कट झाले, अनेकांना बिले भरता येत नाहीत. कारण बिल 40 हजारांवर आले आहे. गावप्रमुख सन्नो. बशरुद्दीनचे बिल चार हजारांवर आले आहे.
फ्रिज बंदमुळे थंड पाण्यासाठी गैरसोय झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. तसेच मोबाईल चार्ज करण्यासाठी शहरात जावे लागते, अनेकांच्या घरी सोलार बसवले आहे, त्यामुळे काही कामे होत आहेत. अनेक ठिकाणी विद्युत उपकरणे बंद झाली. फ्रीज आणि टीव्ही बंद 5 वर्षापासून बंद झाला आहे. गावाचे अध्यक्ष रईस म्हणतात की, कोणी आजारी असेल तर पंख्याअभावी त्याचा जीव गुदमरत राहतो. तो रुग्ण घरी बेडवर झोपू शकत नाही.
मोबाईल चार्ज करण्यासाठी लाईट नाही. मुख्याध्यापक म्हणतात की, मुलांच्या शिक्षणाचे वीजेअभावी नुकसान होत आहेत. त्यांचा दिवस झाडाखाली आणि बागेत जातो. मात्र डासांच्या हल्ल्यामुळे रात्री झोप येत नाही. राज्याचे संबंधित मंत्री सुरेश राही म्हणाले की, निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या दोन दिवस आधी मी माझ्या स्वनिधीतून अहमदनगरसह तीन गावांसाठी अर्थसंकल्प जाहीर केला होता. मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही, यासंदर्भात सीडीओशी चर्चा केली आहे. मी स्वतः कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या गावाचा आढावा घेतला. आता मी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. आचारसंहिता आता संपली आहे. लवकरच वीजेचे काम होईल.
तर दुसरीकडे कार्यकारी अभियंता सुधीरकुमार भारती म्हणाले की, अहमदनगर गावात दुसऱ्या गावातून वीज येते. मात्र गावात पूर्ण अंधार नाही. ट्रान्सफॉर्मरची काही समस्या असू शकते. मात्र माझ्याकडे तक्रार आलेली नाही, तरीही ग्रामस्थांनी तक्रार केल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल. त्याच वेळी सन्नो गावचे प्रमुख म्हणाले की, वीजेसंदर्भात एक डझनहून अधिक तक्रारी वरिष्ठ वीज अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. मात्र कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एकही प्रयत्न यशस्वी होत नाही. त्यामुळे संपूर्ण गावाला संकटात जगावे लागत आहे.