विशेष प्रतिनिधी, नागपूर
आले आणि विलायची टाकून केलेला चहा सर्वांत खास. ज्या लोकांना आले सहन होत नाही, ते विलायची टाकून चहा घेऊ शकतात. केवळ चहाच नाही तर विलायची टाकल्याने अनेक पदार्थांची चव सुरेख होते. विलायचीत पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटामीन बी1, बी6 आणि व्हिटामिन सी आढळते. वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर विलायचीत असलेले फायबर व कॅल्शियम वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते.
फॅट्स वाढू देत नाही
पोटाच्या जवळ वाढलेली चरबी सहजासहजी जात नाही. या चरबीमुळे बरेचदा व्यक्तिमत्त्वदेखील खुलून दिसत नाही. पण हिरवी विलायची नियमित खाल्यास ती फॅट्स वाढू देत नाही. ही चरबी बरेचदा ह्रदयाशी संबंधित आजारांचेही मूळ आहे.










