मुंबई – Volkswagen Taigun SUV या वाहनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २३ सप्टेंबर २०२१ रोजी अनावरण करण्यात आलेल्या या एसयूव्हीच्या आतापर्यंत १८ हजार बुकिंग झालेल्या आहेत. या एसयूव्हीला चांगलीच पसंती मिळाली असून, दररोज सरासरी २५० बुकिंग होत आहेत. परंतु या एसयूव्हींचे वाटप करण्यात आलेला साठा संपल्याने बुकिंग थोड्या दिवसांसाठी बंद होणार आहे.
१०.४९ लाखांनी सुरुवात
VW Taigun चार ट्रीम्स-कंफर्टलाइन, हायलाइन, टॉपलाइन आणि जीटी मध्ये मिळते. १०.४९ लाखांपासून ते १७.५० लाखांच्या किमतीदरम्यान मिळणारी एसयूव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. भारताच्या ११५ शहरांमध्ये कंपनीच्या १५० सेल्स आणि ११९ सर्व्हिस फॅसेलिटी आहे.
दोन पेट्रोल इंजिनचे पर्याय
या एसयूव्हीत दोन पेट्रोल इंजिनचे पर्याय आहेत. १.० लिटर ३ सिलिंडर टर्बोचार्ज्ड आणि १.५ लिटर ४ सिलिंडर टर्बोचार्ज्डमध्ये उपलब्ध आहे. टायगनचे ३ सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिन ५००० ते ५५०० आरपीएम आणि १७८ एनएमचे पीक टॉर्कवर ११५ पीएसचे पावर जनरेट करते. एसयूव्हीमध्ये ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅन्डर्ड आहे. टायगनचे १.० लिटर इंजिन ६-स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक पर्यायात मिळते.
टायगनचे व्हीलबेस सर्वात मोठे
टायगनचे १.५ लिटर टीएसआय ईव्हीओ इंजिन २५० एनएम च्या पीक टॉर्क आणि ५०००-६००० आरपीएमच्या दरम्यान १५० पीएसची पावर देते. यामध्ये पॅडल शिफ्टसोबक ७ स्पीड डीएसजी इंजिनही मिळते. टायगनमध्ये स्कोडा कुशालचे एमक्यूबी एओ इन प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. टायगन या सेगमेंटच्या सर्वात मोठ्या व्हीलबेससह मिळते. तिचे व्हीलबेस २६५१ एमएमचे आहे.