वॉशिंग्टन – सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म अधिकाधिक ग्राहकाभिमुख करण्यासाठी कंपन्यांकडून वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत. त्याच उद्देशाने फेसबुकने आता नवे पाऊल पुढे टाकले आहे. फेसबुक आता किरकोळ विक्रेत्यांसाठी पैसे भरणा करण्याची सुविधा ऑगस्ट महिन्यापासून देणार आहे.
क्रेडिट कार्ड कंपन्यांपैकी लिब्रा क्रिप्टोकरेन्सी प्रकल्पातून बाहेर गेल्याच्या काही दिवसांनंतरच फेसबुकने या व्यवसायात उडी घेतली आहे. फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या अॅपवरही ही प्रणाली सुरू झाली आहे. या अंतर्गत ऑनलाइन विक्रेत्यांसाठी ही सुविधा पुढील महिन्यात कार्यान्वित होईल.
बँकिंगची माहिती सुरक्षित
फेसबुकवर पे वर पैसे भरणा केल्यास आम्ही ग्राहकांची (भरणा प्रक्रिया, व्यवहाराची तारीख, बिलिंग, वाहतूक आणि संपर्क विवरण) माहिती एकत्रित करू. तुमचे कार्ड आणि बँक खात्याच्या क्रमांकाला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही फेसबुक पे ला डिझाइन केले आहे, असे फेसबुक कंपनीने म्हटले आहे.
फेसबुकवर ग्राहकांना मदत
फेसबुकच्या इतर उत्पादनांसारखाच फेसबुक पे चा वापर प्रासंगिक सामग्री, जाहिरात देणे, ग्राहकांना मदत करणे आणि सुरक्षेला महत्त्व देण्यासारख्या उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. ग्राहकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि बँक खात्यांच्या क्रमांकांचा उपयोग त्यांनी पाहिलेल्या जाहिरातींना सूचित करण्यासाठी केला जाणार नाही, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.