मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आयटेलने आज नवीन स्मार्टफोन ‘ए९० लिमिटेड एडिशन’च्या लाँचची घोषणा केली, ज्यामध्ये स्लीक, प्रीमियम कॅमेरा ग्रिड डिझाइनसह अत्यंत शक्तिशाली मिलिटरी ग्रेड टिकाऊपणा आहे. हा स्मार्टफोन ७ हजारांहून कमी किंमतीच्या श्रेणीमध्ये स्टाइल व टिकाऊपणाची खात्री देतो. आयटेल ए९० लिमिटेड एडिशनची खासियत म्हणजे व्हिज्युअली आकर्षक कॅमेरा डेको, जे अद्भुत लुकसह मॅक्स स्वॅग देते. टिकाऊपणा वाढवत हा डिवाईस आयटेलच्या ३पी वचनासह येतो, जो धूळ, पाणी आणि नकळतपणे खाली पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतो. ए९० स्मार्टफोन आयपी५४ प्रमाणित संरक्षणासह डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे जलरोधक, धूळरोधक असण्यासोबत नकळतपणे खाली पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतो. हा मिलिटरी ग्रेड टिकाऊपणा, तसेच एमआयएल-एसटीडी-८१० एच प्रमाणन असलेला श्रेणीमधील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यामुळे मजबूत टिकाऊपणा असलेला श्रेणीमधील एकमेव स्मार्टफोन आहे.
या स्मार्टफोनमध्ये अॅव्हियाना – आयटेलचे सुपर इंटेलिजण्ट एआय असिस्टण्ट आहे, जे दैनंदिन टास्क्स सोपे करण्यासाठी आणि जीवन अधिक सुलभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे वैशिष्ट्य ७ हजारांहून कमी किंमतीच्या श्रेणीमध्ये क्वचितच पाहायला मिळते. हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम व ४ जीबी रॅम या दोन डायनॅमिक रॅम व्हेरिएण्ट्समध्ये येतो, ज्यांची किंमत अनुक्रमे फक्त ६,३९९ रूपये आणि ६,८९९ रूपये आहे आणि भारतभरातील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन १०० दिवसांमध्ये मोफत स्क्रिन रिप्लेसमेंट देखील देतो, ज्यामधून उत्तम विश्वसनीयतेची खात्री मिळते, जी भारतात फक्त आयटेलकडून देण्यात येते.
आयटेल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरिजीत तालापात्रा म्हणाले, ”टिकाऊपणा क्षमतेच्या पलीकडे जातो, जेथे प्रत्येक क्षणामधून विश्वसनीयता मिळणे महत्त्वाचे आहे. आमच्या कुटुंबामधील नवीन ए९० लिमिटेड एडिशन स्मार्टफोन आमच्या विश्वासाला प्रबळपणे सादर करतो, ते म्हणजे स्मार्टफोन्स जीवनातील दैनंदिन आव्हानांचे निराकरण करण्यासाठी आणि जनतेला तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी प्रबळपणे डिझाइन करण्यात आले पाहिजे. मिलिटरी ग्रेड टिकाऊपणा असलेला आयटेल ए९० लिमिटेड एडिशन मजबूतीबाबत तडजोड न करता स्टायलिश उत्पादनांची मागणी करणाऱ्या व्यक्तींसाठी डिझाइन करण्यात आला आहे. आमच्या उत्पादनाचे मुलभूत तत्त्व आमचे ३पी वचन आहे, धूळरोधक, जलरोधक आणि नकळतपणे खाली पडल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण. आयटेल नेहमी नाविन्यतेमध्ये अग्रस्थानी आहे आणि या डिवाईसमधून भारतासाठी उत्पादने निर्माण करण्यावरील आमचा अविरत फोकस दिसून येतो.”
ए९० लिमिटेड एडिशनचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, ६.६-इंच ९० हर्ट्झ एचडी+ डिस्प्ले आणि सर्वोत्तम डीटीएस समर्थित साऊंड टेक्नोलॉजी, जे आकर्षक रंगसंगती, सुस्पष्टता व आकर्षक व्हिज्युअल्ससह उत्साहपूर्ण अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये भर करण्यात आलेले ऑल्वेज-ऑन डिस्प्ले आणि डायनॅमिक बार वापरकर्त्यांना विनाव्यत्यय बॅटरी स्थिती, कॉल्स, नोटिफिकेशन्स अशा महत्त्वपूर्ण घटकांसह कनेक्टेड राहण्याची खात्री देतात. फोटोग्राफीप्रेमी १३ मेगापिक्सल रिअर कॅमेराचा आनंद घेऊ शकतील, ज्यामध्ये प्रगत इमेज प्रोसेसिंग आणि स्लाइडिंग झूम बटन आहे, ज्यामुळे उत्साहपूर्ण क्षण, लक्षवेधक सूर्यास्त यांसह आकर्षक गोष्टी सहजपणे कॅप्चर करता येऊ शकतात. नवीन स्लाइडिंग झूम बटन त्वरित एका हाताने झूम करण्याची आणि त्वरित स्नॅपशॉट्स कॅप्चर करण्याची सुविधा देते.
ए९० लिमिटेड एडिशनमध्ये ऑक्टा-कोअर प्रोसेसर टी७१०० ची शक्ती आहे. हे संयोजन विनासायास मल्टीटास्किंग, गेमिंग व प्रभावीपणे व्हिडिओ कॉल्सची खात्री देते. सुरक्षितता आणि सहज उपलब्धतेसाठी ए९० मध्ये फेस अनलॉक व साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे, जे संरक्षण व सोयीसुविधा देतात. विशाल ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि १५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेला हा डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्याची खात्री देतो. तसेच, ३६ महिन्यांच्या हमीपूर्ण विनाव्यत्यय कार्यरत राहण्याच्या खात्रीसह वापरकर्ते आगामी वर्षांसाठी दीर्घकालीन कार्यक्षमता व समाधानाचा आनंद घेऊ शकतात.
आयटेल ए९० लिमिटेड एडिशन स्मार्टफोनपेक्षा अधिक असून तुमचा स्वत:चा स्मार्ट जोडीदार आहे, जो शक्तिशाली, सर्वोत्तम व स्टायलिश आहे आणि भारतातील आधुनिक काळातील तरूणांसाठी परिपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन आणि अतुलनीय टिकाऊपणासह आयटेल ए९० लिमिटेड एडिशन ७ हजार श्रेणी अंतर्गत नवीन मापदंड स्थापित करण्यास सज्ज आहे.