मुंबई – भारतीय बाजारात काॅम्पॅक्ट एसयूव्ही म्हणजेच छोट्या आकारातील कार फारच जलद लोकप्रसिद्ध होत आहेत. कमी किंमत, देखभाल दुरुस्तीचा कमी खर्च आणि चांगल्या मायलेजमुळे बहुतांश लोक या वाहनांना पसंती देत आहेत. या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक मॉडेल उपलब्ध आहेत. परंतु मारुती सुझुकीची ब्रेझा ही एसयूव्ही अनेक दिवसांपासून या सेगमेंटचे नेतृत्व करत आहे. गेल्या जूनमध्ये मारुती ब्रेझा देशातील चौथी आणि या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.
माध्यमांच्या वृत्तांनुसार, जून महिन्यात कंपनीच्या १२,८३३ वाहनांची विक्री झाली आहे. हा आकडा गेल्यावर्षी जूनमध्ये झालेल्या विक्रीच्या तुलनेत १८२ टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये कंपनीने ४,५४२ वाहनांची विक्री झाली होती. गेल्या वर्षी ऑटो एक्स्पोच्या दरम्यान या कारला बाजारात उपलब्ध करून देण्यात आले होते.









