नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये १४ ऑगस्ट अखेर ६६.८९ टक्के साठा आहे. गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसामुळे धरणांची पातळी वाढली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणाचा साठा ८६.१३ टक्के तर समुहात ८३.६८ टक्के साठा आहे.
नाशिक जिल्ह्यातील भावली, वालदेवी, हरणाबारी, केळझर, भोजापूर धरण हे ओव्हरप्लो झाले. तर कडवा धरण ८१.५८, दारणा धरण ८७.३७, भरले आहे. जूनपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानंतर आता कुठे काही धरणात पाणीसाठा वाढतो आहे. पण, तरी काही धरणाची स्थिती अजूनही चिंताजनक आहे.