नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली मधील प्रस्तावित नवीन संसद भवन, मध्यवर्ती सभागृह आणि पंतप्रधान यांच्या नव्या निवासस्थानावरुन वादंग निर्माण होत आहे. मध्यवर्ती सभागृह आणि प्रस्तावित नवीन पंतप्रधानांच्या निवासस्थानाविषयी विरोधी पक्ष दररोज प्रश्न उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे भाजपने विरोधी पक्षांवर जोरदार टीका करत प्रतित्त्युर दिले आहे.
केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान ‘तीन मूर्ती भवन ‘ या वास्तूला त्यांच्या नावाने स्मारक बनविण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी राहत असलेल्या सफदरजंग यांच्या घराचे स्मारक त्यांच्या स्मरणार्थ बनविण्यात आले. तसेच आजही सोनिया गांधी राहत आहेत, त्या घराला भाजपाने कधीही ‘गांधी महल ‘ असे म्हटले नाही. परंतु विरोधक त्या प्रस्तावित घरास ‘मोदी महल ‘ म्हणून संबोधत आहेत.
अद्याप येथे बांधकामही सुरू झालेले नाही, आणि विरोधकांनी त्याला मोदींचा राजवाडा म्हटले. मात्र ते पंतप्रधानांचे निवासस्थान आहेत. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नाही. तसेच प्रस्तावित सेंट्रल व्हिस्टामध्ये सध्या केवळ मध्यवर्ती महामार्ग, ज्या राजपथवर परेड आहे आणि संसदेची नवीन इमारत बांधकाम सुरू आहे. या दोघांवर खर्च केलेली रक्कम केवळ १३०० कोटी रुपये आहे. सेंट्रल एव्हेन्यू आणि संसद भवनाच्या बांधकाम कामात गुंतलेल्या सुमारे तीन हजार कामगारांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या देखभालीले संपूर्ण सुरक्षिततेसह काम केले जात आहे, आणि देशाच्या दृष्टीने सर्व प्रकारे फायदेशीर आहे. पण विरोधकांना फक्त राजकारण करत आहे.