इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जग इतक्या झपाट्याने एका नव्या युगात प्रवेश करत आहे की कित्येकदा आपलाच आपल्या डोळ्यांसमोर विश्वास बसत नाही. जपानमधून एक अतिशय मजेशीर घटना समोर आली आहे, जिथे काही लोकांना रस्त्यावर कुत्रा दिसला, त्यानंतर त्यांनी ही सामान्य घटना पाहिली. पण सत्य हे होते की तो कुत्रा नसून चक्क माणूस होता. यामागचे सत्य तुम्हीही जाणून घ्याल तर थक्कच व्हाल.
खरं तर, जपानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला लहानपणापासूनच कुत्र्यांची खूप आवड होती. त्याने निश्चय केला होता की, तो कुत्रा बनणार. अगदी थोड्या काळासाठी आणि कोणत्याही प्रकारे तो कुत्रा बनणार. यानंतर त्याने आपले स्वप्न पूर्ण केले आणि यासाठी त्याने बऱ्यापैकी खर्च करून आपले स्वरूप बदलले. लूक बदलण्यासाठी, त्याने प्रथम स्पेशल इफेक्ट्स वर्कशॉपशी संपर्क साधला आणि स्वतःला एक अल्ट्रा रिअलिस्टिक कुत्र्याचा पोशाख मिळवून दिला.
हा पोशाख घातल्यानंतर, तो कुत्रा नाही हे कोणीही त्याला ओळखू शकले नाही. वेशभूषा पाहता तो कुत्रा आहे असे दुरूनच दिसते. हा पोशाख पांढऱ्या रंगाच आहे. त्याचे डोके कुत्र्यासारखे असून नखेही बाहेर आले आहेत. ही संपूर्ण घटना त्या व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलवरून सर्वांना सांगितली आहे.
टोको असे या माणसाचे नाव आहे आणि टोकोने त्याची क्रेझ पूर्ण करण्यासाठी वर्कशॉपमधील सिंथेटिक फर वापरला आहे. अगदी लहान तपशील देखील बारकाईने त्याने तयार केला. टोकोने हा फर परिधान केला आहे आणि ट्विटरवर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
https://twitter.com/zeppetJP/status/1513336198856851461?s=20&t=QHxCyp_mTXMMi8qZegTnnA