विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणासह राज्यातील महत्त्वाच्या १२ विषयाबाबत चर्चा केली. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे बरोबर होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीत दीड तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्यात मुख्यमंत्री व पंतप्रधान मोदी यांची ३० मिनिट व्यकिगतही चर्चा झाली. या भेटीत काय चर्चा झाली याबाबतची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत महाराष्ट्र सदनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पत्रकार परिषदेमधील मुद्दे
– राज्याचे प्रमुख विषयावर चर्चा झाली
– सर्व विषय पंतप्रधानांनी गांभीर्याने एेकून घेतले.
– सकारात्मक पध्दतीने सोडवतील ही अपेक्षा
– मराठा आरक्षण, इतर मागासवर्गाचा विषय, जीएसटी, पदोन्नतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडची जागेची उपलब्धता, शेतक-यांचा पीक विमा अटी व शर्थी, यासह प्रमुख विषयावर चर्चा झाली.
– वादळामुळे झालेल्या नुकसानीचे निकष बदलण्याचा विषयावरही चर्चा
– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे.
– पंतप्रधानांनी लवकरच माहिती घेऊन त्यात सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले आहे.
…..
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पत्रकार परिषदेतील मुद्दे
– आरक्षणाबाबतची ५० टक्के मर्यादा शिथील करण्याची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी
– मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचे प्रमुख मुद्दे निदर्शनास आणून दिले.
–
उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकार परिषदेमधील मुद्दे
– बारा मुद्दे, दीड तास चर्चा झाली
– ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज संस्थेमध्ये ५६००० हजार जागावर परिणाम
– ५० ट्क्के आरक्षणाची अट शिथील करण्याची मागणी केली
– २४ हजार ३०६ कोटीचा जीएसटी परतावा लवकर देण्यात यावा
– पीक विम्यासाठी बीड पॅटर्नची राबवण्याची पंतप्रधानांकडे मागणी
– एससी, एसटी, ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी घटनेत दुरुस्त करण्याची मागणी
– १४ वा वित्त आयोगातील थकीत १ हजार ४४४ कोटीचा निधी तत्काळ मिळावा
– राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील १२ जागाबाबतही चर्चा
https://twitter.com/micnewdelhi/status/1402164992258940934?s=20