मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑस्ट्रेलियामध्ये उच्च शिक्षणासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०२३ मध्ये जवळपास १५ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत यात एकूण २० टक्क्यांची वाढ झाली असल्याचे युनिव्हर्सिटी लिव्हिंग या आघाडीच्या जागतिक विद्यार्थी निवास मार्केटप्लेसच्या ‘बीयॉण्ड बेड्स: डिकोडिंग ऑस्ट्रेलियाज स्टुडण्ट हाऊसिंग मार्केट’ अहवालातून निदर्शनास आले आहे.
या अहवालामधून निदर्शनास येते की ऑस्ट्रेलियामधील शिक्षणासाठी मागणीमध्ये वाढ झाली आहे. परिणामत: किफायतशीर विद्यार्थी निवास सुविधेमध्ये कमतरता जाणवत आहे. आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणाचे झपाट्याने विस्तारीकरण होत असताना मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध आकडेवारीमधून ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या ६१३,२१७ असल्याचे दिसून येते.
तसेच ऑस्ट्रेलियन उच्च शिक्षणामध्ये नोंदणी करणा-या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये जवळपास ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन उच्च शिक्षणामध्ये नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये ३३ टक्के आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत. भारत, चीन, नेपाळ, कोलंबिया व व्हिएतनाम हे ऑस्ट्रेलियामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे अव्वल पाच स्रोत देश आहेत. यंदा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियन अर्थव्यवस्थेमध्ये ३० बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सहून अधिक योगदान देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
अहवालामधून निदर्शनास येते की, ऑस्ट्रेलियाच्या विद्यार्थी निवास बाजारपेठेने अलिकडील वर्षांमध्ये मोठी वाढ केली आहे आणि १७ टक्क्यांच्या सीएजीआरसह १० बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर असण्याची अपेक्षा आहे. बाजारपेठेला ऑन-कॅम्पस् व ऑफ-कॅम्पस् निवासामध्ये विभागण्यात आले आहे, जेथे बाजारपेठेत १० टक्के प्रमाण ऑन-कॅम्पस् निवासाचे आहे, तर उर्वरित ९० टक्के प्रमाणामध्ये ऑफ कॅम्पस् निवासाचा समावेश आहे.
अहवालाच्या अंदाजानुसार ऑस्ट्रेलियाच्या विद्यार्थी निवास क्षेत्रात ४२ युनिव्हर्सिटींमध्ये ६०,००० हून अधिक बेड्स आहेत, ज्यामध्ये युनिव्हर्सिटी व कॉर्पोरेटद्वारे व्यवस्थापित निवास सुविधेचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रमुख पीबीएसए (परपोज-बिल्ट स्टुडण्ट अकोमोडेशन) कंपन्यांसह काही लहान प्रादेशिक पीबीएसए कंपन्या जवळपास ९०,००० बेड्सचे व्यवस्थापन पाहण्याची अपेक्षा आहे. या पीबीएसए बेड्सपैकी २६ टक्के पीबीएसए बेड्सवर देशांतर्गत विद्यार्थ्यांचा ताबा आहे, तर उर्वरित बहुतांश बेड्सवर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा ताबा आहे. याव्यतिरिक्त खाजगी अपार्टमेंट्स बेड्स जवळपास ३६०,००० आहेत, तर होमस्टेजमध्ये जवळपास १००,००० बेड्स आहेत. युनिव्हर्सिटी विभागातील एकूण नोंदणीमध्ये जवळपास १५,५०,००० विद्यार्थी आहेत, ज्यामध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पण, वर्षभरात प्रमुख शहरांमध्ये भाडे खर्च १० ते २० टक्क्यांनी वाढला असल्यामुळे अधिक किफायतशीर निवास पर्यायांसाठी मोठी गरज आहे.
युनिव्हर्सिटी लिव्हिंगचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ अरोरा म्हणाले, “अहवालाच्या सादरीकरणासह आमचा ऑस्ट्रेलियामधील विद्यार्थी निवास बाजारपेठेच्या गतीशीलतेबाबत बहुमूल्य माहिती देण्याचा उद्देश आहे
This increase in the number of students going to Australia
.