विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
मोबाईलच्या व्हॅाटसअॅप वापरकर्त्यांनी १५ मे पर्यंत नवीन गोपनीयता धोरण स्वीकारले नाही, तर त्यांचे व्हॉट्सअॅप खाते बंद केले जाणार नाही. मात्र व्हॅाटसअॅपची अट न मानल्यास नवीन गोपनीयता धोरण स्वीकारण्याची अधिसूचना १५ मे नंतर काही आठवड्यांसाठी पाठविली जाईल, परंतु या अधिसूचनेनंतरही फेसबुक आणि इन्स्टंट मेसेजिंग अॅपने व्हॅाटसअॅपची अट मान्य केली नाही, तर व्हॅाटसअॅप वापरकर्त्यांची वैशिष्ट्ये हळूहळू कमी केली जातील. त्यामुळे येत्या काही दिवसात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना चॅट लिस्टमध्ये प्रवेश करता येणार नाही, असे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे.
वापरकर्त्याला येणार्या व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलमध्ये प्रवेश करण्याची सोय असेल. मात्र दुसरीकडे व्हॉट्सअॅपचे प्रायव्हसी पॉलिसी काही काळासाठी वापरकर्त्यांद्वारे मंजूर होणार नाही. तसेच व्हॉट्सअॅपने येणारे कॉल किंवा मेसेज पाठविणे थांबवले जाईल. म्हणजे काही काळानंतर नवीन गोपनीयता धोरण मंजूर करावे लागेल. परंतु ग्राहकाने असे न केल्यास आपले व्हॉट्सअॅप खाते बंद केले जाईल. १५ मे पासून त्याची अंमलबजावणी हळूहळू होणार आहे.
कंपनीच्या वतीने निवेदनात असे म्हटले आहे की, काही वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला मान्यता दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांत नवीन प्रायव्हसीसी पॉलिसीबद्दल अधिकाधिक माहिती वापरकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. पण पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप यूजर्सना नवीन प्रायव्हसी पॉलिसी मंजूर करण्यासाठी जादा वेळ देण्यात आला आहे.
दरम्यान, यावर्षी जानेवारीमध्ये व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांना या सेवा अधिसूचनेद्वारे त्यांच्या सेवा कालावधी आणि सार्वजनिक धोरणात बदल करण्यास सांगितले होते. व्हॉट्सअॅप यूजर्सना नवीन प्रायव्हसीसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी सुरुवातीला ८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती, त्यानंतर ती आता १५ मे पर्यंत वाढविण्यात असून आता आणखी मुदतही वाढविण्याची घोषणा करण्यात आली होती.
????????????????
*इंडिया दर्पण लाईव्ह अपडेट्स आता टेलिग्रामवरही*
ताज्या, विश्वासार्ह, गतिमान आणि महत्वाच्या बातम्या मिळवा
*टेलिग्रामवर चॅनल जॉइन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे*