नवी दिल्ली – संपूर्ण देशात सध्या गुगलने ३१.६ लाख रुपयांच्या पॅकेजवर घेतलेल्या एका तरुणाचीच चर्चा आहे. जीएल बजाज संस्थेत शिक्षण घेणाऱ्या माणिक गोयल या तरुणाला गुगलने जे पॅकेज दिले आहे, ते आतापर्यंत इंजिनिअरिंग पूर्ण करणाऱ्या कुठल्याही फ्रेश ग्रॅज्युएटला मिळालेल्या तरुणांपेक्षा सर्वांत जास्त आहे. या पॅकेजने माणिक गोयलचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याने याचे श्रेय महाविद्यालयात मिळालेल्या प्रशिक्षणाला दिले आहे.
जीएल बजाज संस्थेतील विद्यार्थ्यांना यंदा गुगलने ३१.६ लाख, अमेझॉनने ३०.२५ लाख, अडोबने २८.९लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. सिस्को कंपनीने १४.९५, पोस्टमनने १४ लाख, गेनसाईटने १३ लाख, हाऊसिंग डॉट कॉमने ११ लाख रुपयांचे पॅकेज दिले आहे. आफर्सवर नजर टाकली तर कमाल वाटेल. Cognizant ने 161, Capgemini ने 156, Accenture ने 138, TCS ने 105, BirlaSoft ने 80 और HCL ने 60 ऑफर्स दिल्या आहेत.
संस्थेने यंदा बीटेकमध्ये ८७ टक्के, एमसीएमध्ये ८७ टक्के व एमबीएमध्ये शंभर टक्के प्लेसमेंट प्राप्त केले आहेत. यात आणखी वाढ होईल, कारण अद्याप प्लेसमेंटची मालिका सुरू आहे. जीएल बजाज हे उत्तर भारतातील सर्वोत्तम दर्जाचे संस्थान मानले जाते. इंजीनियरींग तसेच मॅनेजमेंटचे शिक्षण देणाऱ्या देशातील आघाडीच्या संस्थांमध्ये त्यांचा समावेश आहे.