विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जगभरात सुमारे २३१ देश आहेत. प्रत्येक देश आपल्या भूमीच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि वायुदलाची स्थापना करतो. काही देशांना सागरी सिमा नसल्याने त्यांचे नौदल नसते. परंतु वायुदल मात्र नक्कीच असते. मात्र जगातील एक देश असा आहे की, त्याच्याकडे नौदल आणि हवाई दल देखील नाही. या देशाकडे केवळ लष्करच आहे. हा देश म्हणजे भारताचे शेजारी राष्ट्र भूतान होय.
कोणत्याही देशावर हल्ला झाल्यास भूमी असो वा जल असो वा आकाश, शत्रूंना सर्व बाजूंनी चोख प्रत्युत्तर दिले जाईल. याकरिता भूदल वायुदल आणि नवोदल सज्ज असते. परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात असा एक देश आहे ज्याचे स्वतःचे नौदल किंवा हवाई दल नाही. यासाठी ते दुसर्या देशावर अवलंबून आहे म्हणजे भारत या देशाला अशी मदत करतो.
भूतान हा दक्षिण आशियामधील एक लहान परंतु महत्वाचा देश असून तो हिमालयात वसलेला आहे. त्यामुळे भूतानमध्ये सर्वत्र फक्त पर्वत आणि डोंगर आहेत. भूतानचे स्थानिक नाव ‘ड्रुक यूल’ आहे, ज्याचा अर्थ आहे ‘ ड्रैगनची जमीन ‘ भूतानमध्ये स्वातंत्र्य व्यवस्था शतकानुशतके चालू आहे. या देशावर कोणीही परकीय सत्तेने राज्य केल्याची इतिहासात नोंद नाही. मात्र भूतानकडे नौदल नाही कारण हा भूमीबांधित देश असून तिबेट आणि भारत यांच्यात स्थित आहे. त्याचबरोबर हवाई दलाच्या क्षेत्रातही भारत हाच भूतानची काळजी घेतो.
या देशात एकच सैन्य दल असून त्याला रॉयल भूतान सैन्य म्हणतात. रॉयल बॉडीगार्ड्स आणि रॉयल भूतान हे पोलिसांचे संयुक्त नाव आहे. तसेच भारतीय सैन्य त्यांना प्रशिक्षण देते. भूतानमध्ये ‘गंगखर पुनसम’ नावाचा डोंगर आहे, जो इथला सर्वात उंच डोंगर म्हटला जातो. आजपर्यंत कोणीही 24,840 फूट उंचीसह या डोंगरावर चढू शकलेला नाही. खरे तर भूतान सरकार कोणालाही या डोंगरावर चढू देत नाही. यामागील कारण म्हणजे भूतानचे लोक पर्वताला देव मानतात. त्यामुळे गंगखर पुनसुम देखील त्यांच्यासाठी एक पवित्र स्थान आहे.
सन 1994 साली भूतान सरकारने डोंगर चढण्यासाठी कायदाही केला होता, त्यानुसार काही पर्यटकांना 20 हजार फूटांपर्यंत पर्वत चढण्याची मुभा दिली जाते. भूतानमध्ये तंबाखूवर पूर्णपणे बंदी आहे. वर्ष 2004 मध्येच संपूर्ण देशात यावर बंदी घालण्यात आली होती. भूतान हा तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्ण बंदी घालणारा जगातील पहिला देश आहे. जर कोणी तंबाखू विकत घेताना किंवा विकताना पकडला गेला असेल तर शिक्षा व दंड करण्याची तरतूद आहे.
सन 2006 साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील 8 वा सर्वात आनंदी देश आहे. एकूण लोकसंख्येपैकी बौद्ध धर्माचे अनुयायी येथे बहुसंख्यक असून वज्रयान बौद्ध धर्म हा या देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे.