मुंबई – पेट्रोल आणि डिझेल सारख्या इंधनाचे भाव गगनाला भिडले असून भविष्यात हे इंधन संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. तसेच यापूर्वी पर्यावरण पूरक वाहनांचा वापर करावा, यासाठी सरकारतर्फे ही प्रोत्साहन देण्यात येत आहे. सहाजिकच अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणले आहेत. त्यामुळे आत्तापासूनच ‘ ई बाईक ‘ मागणी वाढू लागली आहे.
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहने आणणारी अग्रगण्य ई बाइक गो कंपनी बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. भारतीय बाजारपेठेत सादर होणारे हे आतापर्यंतचे सर्वात मजबूत इलेक्ट्रिक वाहन असेल, असा कंपनीचा दावा आहे. सदर स्कूटरची डिझाईन पूर्णपणे भारतात तयार केली गेली आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरला आयसीएटीची मान्यता मिळाली आहे आणि ती फेम 2 सबसिडी कार्यक्रमासाठी देखील पात्र आहे. तर दुसरीकडे JSW समुहाने नवीन वर्षापासून म्हणजे दि. 1 जानेवारीपासून भारतभरातील आपल्या कर्मचार्यांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन जाहीर केले आहे.
कंपनीने एका निवेदनात भारतभरातील कर्मचार्यांसाठी सुरू केलेल्या ‘JSW इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी’ या ग्रीन उपक्रमाची माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, मोठ्या भारतीय कॉर्पोरेट हाऊसचा हा अशा प्रकारचा पहिला उपक्रम आहे आणि त्याचे EV धोरण दि. 1 जानेवारी 2022 पासून देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल. नवीन धोरणानुसार चारचाकी किंवा दुचाकी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देईल, असे सांगण्यात आले. या धोरणाचा उद्देश संपूर्ण समूहाला इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे हा आहे.
JSW समुहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील COP26 शिखर परिषदेत जाहीर केले आहे की, भारताला 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठायचे आहे, त्यादृष्टीने JSW समूहाने हे नवीन EV धोरण आणले आहे. आणि CHRO, JSW ग्रुपचे चेअरमन, दिलीप पटनायक यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहने पारंपारिक IC इंजिन वाहनांपेक्षा अधिक कार्यक्षम असल्याने, जानेवारी 2022 पासून लागू होणारे JSW EV धोरण इतरांसाठी एक बेंचमार्क सेट करेल. ईव्ही केवळ पर्यावरणपूरकच नाहीत तर किफायतशीर देखील आहेत.
JSW समूह पोलाद, ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, पेंट्स, उद्यम भांडवल आणि क्रीडा यासह विविध क्षेत्रांमध्ये गुंतलेला आहे. कर्मचार्यांसाठी EV धोरण जाहीर करण्याव्यतिरिक्त त्यांना कंपनीने स्वतःसाठी CO2 उत्सर्जन लक्ष्य देखील सेट केले आहे. JSW स्टील (JSW समूहाचा एक भाग) ने हवामान बदलाचे धोरण स्वीकारले आहे आणि 2005 च्या आधारभूत वर्षात 2030 पर्यंत 42 टक्के CO2 उत्सर्जन कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.