वी दिल्ली – देशात वाहनांचे लाँचिंग सणासुदीच्या दिवसात केले जाते. परंतु कारनिर्माता कंपन्यांनी नवे वाहन बाजारात उतरविण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. जागतिक पातळीवर काही वाहने आणि एसयूव्हीची लाँचिंग पुढील महिन्यात होणार आहे. त्याबाबत आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.
Tata Tiago NRG/HBX
टाटा मोटर्सतर्फे ४ ऑगस्टला एक नवा टफ आणि स्पोर्टी अवतार सादर करण्यात येणार आहे. हा अवतार थोडा गंभीर आणि थोडा मजेशीर आहे. कार निर्माता कंपनीने मॉडेलचे नाव आणि तिच्या तपशीलाचा खुलासा अद्याप केलेला नाही. परंतु काही वृत्तांनुसार, हे वाहन कंपनीचे मायक्रो एसयूव्ही HBX असू शकते. तर काही वृत्तांनुसार, अपडेटेड टाटा टियागोसुद्धा असू शकते. सध्या एवढेच म्हणता येईल, की ४ ऑगस्टला टाटाचे नवे प्रॉडक्ट भारतात दाखल होणार आहे.
Skoda Kushq
स्कोडा कुशाक या वाहनाला कंपनीने नुकतेच लाँच केले आहे. आता कंपनीतर्फे कुशाकचे १.५ लिटर पेट्रोल इंजिनसुद्धा सादर करण्यात येणार आहे. वाहनाच्या डिलिव्हरीची सुरुवात ११ ऑगस्ट २०२१ पासून होणार आहे. कुशाकच्या टर्बोचार्ज्ड गॅसोलीन प्रकारात १४७ बीएचपीच्या पॉवरसोबत २५० एनएमच्या टार्कचा दावा करण्यात आला आहे. सध्या नवी स्कोडा मिड-साइज एसयूव्ही ११३ बीएचपीची पॉवर देते. तिच्या किमतीची १०.५० लाख रुपयांपासून सुरुवात होते.
Honda Amaze facelift
जापानी कंपनी Honda अमेझ कॉम्पॅक्ट सेडानचे अपडेट १७ ऑगस्टला देणार आहे. या कारच्या बाहेरील भागात सौंदर्यवर्धक बदल केले जाणार आहेत. त्यामध्ये नव्या डिझाइनसाठी एलईडी हँडलॅम्प्स, अलॉय हिल्सचा नवा सेट आणि थोडा, ट्विस्टेड बंपरचा समावेश आहे. सध्या या कारची किंमत कळालेली नाही.
New-Gen Force Gurkha
२०२१ च्या तिसर्या तिमाहीत नव्या पिढीतील गोरखा कारला फोर्स मोटर्सतर्फे लाँच करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तिच्या अधिकृत लाँचिंगची अद्याप घोषणा झालेली नाही. ही ऑफ-रोड एसयूव्ही ऑगस्टमध्ये लाँच केली जाऊ शकते. २०२१ फोर्स गोरखामध्ये BS6 डिझेल इंजिन असेल. या कारची किंमत १० लाखांपासून सुरू होऊ शकते.