विशेष प्रतिनिधी, मुंबई
वाहन खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अत्याधुनिक तसेच दणकट वाहन असावे, असे वाटत असते. भारतातील खेड्यातील एकूणच रस्त्यांची परिस्थिती पाहता दणकट आणि मजबूत वाहनांची अधिक मागणी असते. परंतु त्यात अत्याधुनिक सुविधा असाव्यात, अशी देखील वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा असते. सध्या बाजारात सर्वात हीट असलेल्या महिंद्राच्या ‘थार’ या वाहनाला टक्कर देण्यासाठी मारुती कंपनीने एसयूव्ही हे नवीन अत्याधुनिक आणि दणकट वाहन बाजारात आणणार आहे.
मारुतीच्या या नव्या एसयुव्हीविषयी जाणून घेऊ या…
व्हीलबेसची लांबी
भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी यांनी महिंद्राच्या थारशी स्पर्धा करण्यासाठी ऑफ-रोडर जिमि ची 5-दरवाजाचे मॉडेल आणण्याची योजना आखली आहे. मारुती जिम्नीच्या एसयूव्हीची व्हीलबेसची लांबी 3850 मिमी, रुंदी 1645 मिमी आणि उंची 1730 मिमी असेल. त्याच्या 3-दरवाजाच्या एसयूव्ही, सिएरापेक्षा अधिक वजनदार आणि 100 किलो जास्त असेल.
इंजिनची वैशिष्ट्ये
5-दरवाजाची मारुती जिम्नी ब्रँडची ग्लोबल डिझाइन भाषा सादर करेल आणि डिझाइन बिट नवीन 3-दरवाजा आवृत्तीद्वारे प्रेरित होईल. नवीन 5 दरवाजाच्या जिमिनीच्या आतील भागात मल्टी फंक्शनल स्टीयरिंग व्हील, लेदर सीट्स, अपडेटेड इन्स्ट्रुमेंट कन्सोल, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम नवीनतम स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, फ्रंट आणि रियर आर्मट्रेस्ट्स आदि असण्याची अपेक्षा आहे.
महिंद्राच्या थारशी स्पर्धा
मारुती जिम्नी स्वदेशी वाहन निर्माता महिंद्राच्या ऑफ-रोडर एसयूव्ही थारच्या 5-दरवाजा मॉडेलला थेट स्पर्धा करेल. साधारणतः 2022 पर्यंत मारुती जिम्नीची 5 दरवाजा मॉडेल भारतात दाखल होईल. थार मॉडेल भारतात इतका लोकप्रिय आहे की, त्याच्या विक्रीवर लॉकडाउन आणि कोरोना विषाणूचा त्यावर परिणाम झाला नाही. आतापर्यंत कंपनीला या ऑफ-रोडर चे सुमारे 55 हजार बुकिंग प्राप्त झाले आहे असून त्याची प्रतीक्षा कालावधी आता 10 महिना झाला आहे.