मुंबई – बाजारात सध्या नवे तंत्रज्ञान स्वीकारलेल्या वाहनांची चलती आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञानासह काहीतरी वेगळे देण्याचीही स्पर्धा वाहन निर्माता कंपन्यांमध्ये सुरू असते. ह्युंदई मोटरची उपकंपनी ह्युंदई मोबिसने असेच एक वाहन सादर केले आहे. त्याच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊयात.
ह्युंदई मोटरची उपकंपनी Hyundai Mobis ने ई-कॉर्नर मॉडेल सादर केले आहे. या वाहनची चाके ९० अंशात फिरू शकतात. चाके इतके वळल्यानंतर वाहन चालू शकते हे विशेष. या सुविधेमुळे वाहन कमी जागेत पार्क होऊ शकते किंवा पार्किंमधून बाहेर येऊ शकते. ह्युंदई मोबिसच्या ई-कॉर्नर मॉडेलच्या प्रत्येक चाकात एक इलेक्ट्रिक मोटर, ब्रेकिंग सिस्टिम, सस्पेन्शन आणि स्टेअरिंगचे कॉम्बिनेशन असते.
हे ई-कॉर्नर मॉडेल सर्वप्रथम लाग वेगास येथे झालेल्या सीईएस २०१८ मध्ये सादर करण्यात आले होते. त्यावेळी हे कॉन्सेप्ट सिस्टिम होते. आता या वाहनाची प्राथमिक पायरी आहे. कंपनीने याचे एक प्रोटोटाइप सादर केले आहे. गेल्या तीन वर्षात ह्युंदई मोबिसने प्रॅक्टिकल प्रॉडक्ट बनविण्यासाठी वाहनाच्या रचनेचे नूतनीकरण केले आहे. या रचनेला वास्तविक वाहनांमध्ये लागू केले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाला कंट्रोल करण्यासाठी कंपनीने इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट (ईसीयू) सुद्धा तयार केले आहे.
इतर वाहनांपेक्षा वेगळे कसे
पारंपरिक वाहनांची चाके जास्तीत जास्त ३० अंशापर्यंत फिरू शकतात. वाहनचालक साधारणतः लहान गल्लीबोळात वाहन पार्क करू शकत नाही. त्यामध्ये प्रवाशांना बसताना किंवा उतरताना अडचण निर्माण होऊ शकते. ई-कॉर्नल मॉडेल ९० अंशापर्यंत फिरू शकते. हे फिचर वाहनांना युनिक व्हेहिकल मुव्हमेंट करू देते. वाहन क्रॅब मोड किंवा उभ्या ठिकाणी पूर्णपणे फिरण्याची सुविधा या फिचरमुळे मिळते. या वाहनाला पूर्ण विश्वासार्हता मिळाल्यानंतर ह्युंदई मोबिसकडून त्याचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. २०२३ पर्यंत सिओल येथील एक कंपनी चार ई-कॉर्नर मॉडेल एकत्रित करण्यासाठी स्केटबोर्ड तयार करणार आहे. दोन वर्षांनंतर सेल्फ ड्रायव्हिंग वाहनांसोबत विलीनीकरण करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.