इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याने आणि ग्राहकांना वेळेत कारचा वेळेवर पुरवठा होत नसल्याने कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor (TKM)) डीलरशिपने टोयोटा इनोव्हा क्रीस्टा (Toyota Innova Crysta) च्या डिझेल कारची बुकिंग तात्पुरती बंद केली आहे. यामागे डिझेल व्हेरिएंटचा प्रतीक्षा कालावधी सांगितला जात आहे. कंपनीने म्हटले आहे की, “टोयोटा इनोव्हा 2005 मध्ये लॉन्च झाल्यापासून खूप पुढे गेली आहे. इनोव्हा या सेगमेंटमधील इतर मॉडेल्सपेक्षा नेहमीच पुढे राहिली आहे.
भारतातील ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी इनोव्हाने अनेक वर्षांमध्ये अनेक बदल केले आहेत, मग ती लक्झरी, आराम किंवा कार्यप्रदर्शन असो. सेगमेंट लीडर म्हणून दुसरा जनरल इनोव्हा क्रिस्टा ग्राहकांची मने जिंकत आहे. भारतात सुमारे १० लाख लोकांकडे ही कार आहे. हे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रातील ग्राहकांना चांगलेच आवडते. सध्या मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने, इनोव्हा क्रिस्टलच्या डिझेल मॉडेलसाठी प्रतीक्षा कालावधी लक्षणीय वाढला आहे. अशा परिस्थितीत कंपनीने डिझेल मॉडेलच्या ऑर्डर घेणे तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने याबाबत सांगितले की, ज्या ग्राहकांनी आमच्या डीलर्सकडे आधीच बुकिंग केले आहे त्यांना आम्ही हे वाहन पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय, आम्ही इनोव्हा क्रिस्टलच्या पेट्रोल मॉडेलसाठी ऑर्डर घेणे सुरू ठेवू. टोयोटा किर्लोस्कर मोटरने जुलैमध्ये १९ हजार ६९३ वाहनांसह एका महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली. जुलै २०२१ मध्ये विक्री झालेल्या १३ हजार १०५ युनिटच्या तुलनेत कंपनीची विक्री ५० टक्क्यांनी जास्त होती.
https://twitter.com/rushlane/status/1564524603992866817?s=20&t=IyHXwQpWVdu2a5cOM6I8Xw
This Car Booking Stop by Company Decision
Toyota Innova Crysta
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19