भारतातील रेवोल्ट मोटर्स या इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनीच्या आरव्ही ४०० आणि आरव्ही ३०० इलेक्ट्रिक बाइक्सला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे या कंपनीने या बाईकचे बुकिंग अक्षरक्षः थांबवले आहे. या कंपनीचे म्हणणे आहे की, ग्राहकांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादांमुळे ओव्हर बुकिंग झाली आहे, त्यामुळे काही काळ बुकिंग थांबविण्यात आले आहे. तथापि, आपल्याला या दोन्ही बाईक्स बुक करायच्या असतील तर कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन आपण केवळ तपशील भरू शकता, मात्र बुकिंग पुन्हा सुरू होताच तुम्हाला सूचित केले जाईल. आता सध्या काय स्थिती आहे ते जाणून घेऊ…
किंमती वाढवल्या
डिसेंबरमध्येच कंपनीने दोन्ही बाईकच्या किंमती वाढवल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले, यानंतर आरव्ही ४००ची किंमत १ लाख १८ हजार ९९९ रुपये होती आणि आरव्ही ३०० ची किंमत ९४ हजार ९९९ रुपये होती. (दोन्ही किंमती एक्स शोरूम आहेत.) या कंपनीने दोन्ही बाईकच्या किंमतीत अनुक्रमे १५ हजार आणि १० हजार रुपयांची वाढ केली होती. एवढेच नाही तर आता बुकिंगची रक्कमही ४ हजार आणि ५ हजार २०० रुपयांनी वाढविली आहे. आरव्ही ४०० साठी बुकिंगची रक्कम आता ग्राहकांना ७ हजार ९९९ रुपये आणि आरव्ही ३०० साठी ७ हजार १९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
एकदा चार्ज केली की एवढी चालते
रिव्होल्ट आरव्ही ४०० इलेक्ट्रिक बाइकमध्ये कंपनीने ३.२४ किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली आहे. विशेष म्हणजे कंपनीची बॅटरी १५० किलोमीटर पर्यंत चालते. देशातील कोणत्याही दुचाकी वाहनांसाठी सर्वात जास्त आहे. हे इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन रायडिंग मोड देतात. बाईकची टॉप स्पीड ताशी ८५ कि.मी.आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे ४ तास लागतात. एकाच चार्जमध्ये बाईक १५० किमी पर्यंत चालते.
बाईक खूपच स्टाइलिश
दोन्ही बाईक देखील दिसण्यात खूपच स्टाइलिश आहेत. यात पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, जिओ-लोकेशन, क्लोज चार्जिंग स्टेशनची माहिती आणि पसंतीचा एक्झॉस्ट साऊंड अशी वैशिष्ट्ये आहेत.